spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Non-Veg खात नसाल तर प्रोटीनयुक्त सोयाबीनचे कबाब नक्की ट्राय करा…

शाकाहारी पदार्थामध्ये सोयाबीन या पदार्थात प्रोटीनसोबतच अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे आहारात सोयाबीन असणे खूप गरजेचं आहे. सोया चंक्सचा वापर करून आपण अनेक पदार्थ तयार करू शकतो. जर तुम्हाला काहीतरी हेल्दी खायचे असेल तर तुम्ही घराच्या घरी सोयाबीनचे कबाब तयार करू शकता.

रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला पुरेसे पोषण अन्न सेवन करता येत नाही. जर तुम्हाला तुमचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर तुम्हाला रोजच्या आहारात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर, प्रोटीन आणि अँटी ऑक्सिडंट्स असणारे पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. जे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला महत्वपूर्ण चालना देते. या पदार्थांचे सेवन करताना योग्य पदार्थांची निवड करणे गरजेचे आहे. शाकाहारी पदार्थामध्ये सोयाबीन या पदार्थात प्रोटीनसोबतच अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे आहारात सोयाबीन असणे खूप गरजेचं आहे. सोया चंक्सचा वापर करून आपण अनेक पदार्थ तयार करू शकतो. जर तुम्हाला काहीतरी हेल्दी खायचे असेल तर तुम्ही घराच्या घरी सोयाबीनचे कबाब तयार करू शकता. सोयाबीनपासून चविष्ट कबाब कसे बनवायचे याची रेसिपी थोडक्यात पाहूया.

सोयाबीन कबाब एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. सोयाबीनपासून बनवलेला हा कबाब खाण्यासाठी खूप चविष्ट असतो आणि तो स्नॅक म्हणून किंवा पार्टीसाठीही उत्तम आहे.

साहित्य:

  • सोयाबीन – १  कप (पाण्यात 30 मिनिटे भिजवून)
  • बटाटे – २  (उकडून, कुस्करून)
  • आले-लसूण पेस्ट – १  चमचा
  • हिरवी मिरची पेस्ट – १  चमचा
  • कोथिंबीर – २ चमचे (बारीक चिरलेली)
  • लाल तिखट – १  चमचा
  • गरम मसाला – १ /२ चमचा
  • धने पूड – १  चमचा
  • जिरे पूड – १ /२ चमचा
  • ब्रेडक्रम्स – १ /२ कप
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळण्यासाठी

कृती:

  • सोयाबीन भिजवून झाल्यावर त्याचे पाणी काढून टाका आणि सोयाबीन मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
  • एका मोठ्या बाउलमध्ये वाटलेले सोयाबीन, उकडलेले आणि कुस्करलेले बटाटे, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला, धने पूड, जिरे पूड, आणि मीठ एकत्र करा.
  • सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्या. आता त्यात ब्रेडक्रम्स घालून पुन्हा मिक्स करा, जेणेकरून मिश्रण थोडे घट्ट होईल.
  • मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे करून, हाताने कबाबाचा आकार द्या.
  • एका कढईत तेल गरम करा. तेल चांगले गरम झाले की, तयार केलेले कबाब तळा. दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळा. जर तुम्हाला कमी तेलात कबाब करायचे असतील तर तुम्ही तव्यावर थोडे तेल टाकून शालो फ्राय देखील करू शकता. 
  • तळलेले सोयाबीन कबाब किचन टॉवेलवर काढून अतिरिक्त तेल काढून घ्या.

तयार सोयाबीन कबाब गरमागरम सर्व्ह करा. हे कबाब तुमच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खायला अतिशय स्वादिष्ट लागतात.

Social Media कितीही प्रबळ असले तरीही विश्वासार्हता टिकवण्याचे काम वृत्तपत्र लेखकांकडूनच, Bhushan Gagrani यांची ग्वाही

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss