spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कच्चे बीटरूट खायला आवडत नाही तर पौष्टिक बीटरूट चटणी नक्की करून पहा…

आरोग्यासाठी फायदेशीर असे बीट जर कच्चे खायला आवडत नसेल तर अशा वेळी तुम्ही बीटरुटची चवदार चटणी नक्की करून बघू शकता. या चटणीचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

बऱ्याच जणांना अनेकदा बीटरूट कच्चे खायला आवडत नाही. बीटरूट खाताना अनेकजण नाकं मुरडतात. पण, बीटरूट हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बीटरूटमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते रक्तवर्धक आहे. बीटरूट नियमित सेवन केल्यास शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढते, ज्यामुळे अ‍ॅनिमिया कमी होतो. तसेच बीटरूटमध्ये कॅलरीज कमी आणि तंतुमय घटक जास्त असतात, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त आहे. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. आरोग्यासाठी फायदेशीर असे बीट जर कच्चे खायला आवडत नसेल तर अशा वेळी तुम्ही बीटरुटची चवदार चटणी नक्की करून बघू शकता. या चटणीचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. ही चटणी तुम्ही इडली, डोसा, चपाती सोबत देखील खाऊ शकता. चला तर मग बीटरुटची चटणी कशी बनवायची याची सोपी रेसिपी बघूया.

बीटरूट चटणी

साहित्य:

  • बीटरूट – १ मध्यम आकाराचा (सोलून किसून घ्या)
  • नारळ (खवलेला) – १/२ कप
  • सुकं खोबरं – १/४ कप
  • हिरव्या मिरच्या – २ ते ३
  • लसूण – ३ ते ४ पाकळ्या
  • जिरे – १/२ चमचा
  • आमसुल किंवा चिंच – १ ते २ लहान तुकडे
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – १ चमचा
  • मोहरी – १/२ चमचा
  • कढीपत्ता – ८ ते १० पाने

कृती:

  •  एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात जिरे, लसूण आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या.
  • परतलेल्या मिश्रणात किसलेला बीटरूट घालून २-३ मिनिटं परता, जोपर्यंत बीटरूट थोडासा मऊ होतो.
  • आता हे मिश्रण थंड होऊ द्या.
  • मिक्सरच्या भांड्यात खवलेला नारळ, सुकं खोबरं, आमसुल किंवा चिंच, मीठ आणि परतलेला बीटरूट घाला. थोडं पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्या.
  • एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता घाला आणि हे फोडणीचं मिश्रण चटणीवर घाला.
  • चटणी व्यवस्थित मिक्स करा.

Raja Hindustani चित्रपटासाठी सुपरस्टार आमिर खानसोबत अभिनेत्रीने तिच्या आईसमोरच शूट केला किसिंग सीन; घ्यावे लागले होते ४७ रिटेक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss