जर तुम्हाला थकवा घालवायचा असेल तर आवर्जून प्या हे पेय

जर तुम्हाला थकवा घालवायचा असेल तर आवर्जून प्या हे पेय

आजकालच्या जीवनशैलीमुळे खूप थकायला होते आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. थकव्यामुळे सकाळी उठल्यावर, पण अनेकांना फ्रेश वाटत नाही. कोणतेही काम करायला उत्साह राहत नाही. दिवसभर ऑफिसचं काम, प्रवासाचा ताण याने आपले शरीर आणि मन दोन्ही थकून जातात. दिवसभराचा थकवा घालवण्याचा असा कोणता उपाय आहे? याचं उत्तर म्हणजे तुम्ही थकवा दूर करणारी पेय पिऊ शकता. या पेयांमुळे तुम्ही दिवसभराचा थकवा पळवून लावू शकता. आणि तुम्ही फळांचा रस देखील पिऊ शकता .

हे ही वाचा : नवरात्रीमध्ये बनवा स्पेशल पनीर बुर्जी , कांदा आणि लसूण न वापरता

 

ताक हे खूप पौष्टिक आणि एनर्जी देणारं पेय आहे. दुपारच्या वेळी ताक आवर्जून प्या. ताक बनवताना त्यात थोडे मीठ आणि साखर घालून चांगले ढवळून घ्या आणि मग ते प्या.

लिंबू सरबत बनवणे खूप सोपे आहे . लिंबू सरबत प्यायल्याने एनर्जी मिळते आणि थकवा देखील कमी होतो. पण रोज रोज लिंबू सरबत पिण्याचा कंटाळा येत असेल तर मोसंबी, संत्री या फळांचा रस देखील तुम्ही पिऊ शकता .

काकडीची साले काढून घ्या. त्याचे तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये घाला. त्यात अर्धे लिंबू पिळा. चिमुटभर मीठ आणि थोडीशी साखर टाका. हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात बर्फाचा तुकडा आणि थोडं पाणी टाका.

 

अंजीर , बदाम , मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि तेच पाणी आणि ते ड्रायफ्रूट खा . भिजवलेले अंजीर, खजूर आणि सगळा सुकामेवा मिक्सरमध्ये टाका. त्यात २ कप दूध टाका. २ बर्फाचे तुकडे टाका. हे सगळं मिक्सरमधून फिरवून घेतलं की भरपूर उर्जा देणारा ड्रायफ्रुट शेक झालं तयार.

हे ही वाचा :

उरलेल्या भातापासून बनवा हॉटेल सारखा फ्राईड राईस

 

Exit mobile version