Saturday, June 29, 2024

Latest Posts

पावसाळ्यात बनवा गरमा-गरम पोह्यांची कचोरी

पावसाचा चांगला जोर वाढत असताना त्याची रंगत वाढवण्यासाठी एक खास खमंग, चटकदार अशा आगळीवेगळी पोह्यांच्या कचोरीची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहोत. ही चटकदार रेसिपी कशी करायची हे पाहुयात.

पावसाळा आला की आपल्याला आठवण येते ती चटकदार खाद्यपदार्थांची. एका बाजूला ओला चिंब करणारा पाऊस आणि दुसऱ्या बाजूला गरमागरम भजी हे कॉम्बिनेशन तर आपल्याला प्रत्येक पावसाळ्यात बघायला मिळते. पाऊस म्हंटल की, भजी आणि तळणीच्या पदार्थांची आठवण येणं साहजिकच आहे. बाहेर जोरदार पाऊस पडतोय आणि एवढं तेलकट पदार्थ खायचे का वगैरे असा विचार करून चालत नाही. म्हणूनच पावसाचा चांगला जोर वाढत असताना त्याची रंगत वाढवण्यासाठी एक खास खमंग, चटकदार अशा आगळीवेगळी पोह्यांच्या कचोरीची रेसिपी तुमच्यासमोर आणत आहोत. ही चटकदार रेसिपी कशी करायची हे पाहुयात.

साहित्य:

  • पातळ पोहे- २ वाट्या
  • बेसन- १/२ वाटी
  • आलं लसूण पेस्ट- १ चमचा
  • बडीशेप- १/२ चमचा
  • धने-जिरे पावडर- १ चमचा
  • हळद- १/४ चमचा
  • आमचूर पावडर- १/२ चमचा
  • लाल तिखट- १/२ चमचा
  • कोथिंबीर- १/४ वाटी
  • मीठ- चवीनुसार
  • तेल तळण्यासाठी

कृती:

  • पातळ पोहे भिजवून त्याचे पाणी काढून टाका व त्याला चांगले मळून त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि २ चमचे तेल घालून बाजूला ठेवा.
  • एका पॅनमध्ये २ चमचे तेलात आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या. त्यामध्ये बडीशेप, धने-जिरे पावडर, हळद, तिखट, आमचूर पावडर घालून चांगले परतून घ्या.
  • नंतर त्यात बेसनचे पीठ, चवीनुसार मीठ आणि साखर घालून हे मिश्रण एकत्र करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात कोथिंबीर व किंचित पाणी टाकून झाकण ठेवून थोड्या वेळ शिजू द्या.
  • भिजवलेल्या पोह्याच्या मिश्रणाचा एक छोटा गोळा घेऊन त्याची लाटी तयार करून घ्या.
  • लाटीमध्ये तयार केलेले मिश्रण भरून चारही बाजूने बंद करून दोन्ही हातानी दाबून चपटे करा.
  • एका कढईत तेल मध्यम आचेवर गरम करून त्यात तयार केलेली कचोरी गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • गरमगरम पोह्यांची कचोरी खाण्यासाठी तयार.

 

हे ही वाचा:

‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ साठी अनुष्काने घेतलं ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण

अखेर प्रतीक्षा संपली!, Xiaomi 14 Civi हा शानदार फोन उद्या होणार लॉन्च

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss