नाश्ता म्हटलं की, इडली, डोसा, पोहे, उपमा अशा अनेक खाद्यपदार्थांची यादी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. परंतु, झटपट आणि चविष्ट नाश्ता तयार कसा करता येईल असे प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न असतो. अशावेळी एक पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलो आहोत. आप्पे तर आपण नेहमीच खातो. पण वेळ खर्च न करता घरात उपलब्ध असणारे साहित्य वापरून गव्हाच्या पिठापासून जाळीदार पौष्टिक आप्पे तयार करू शकतो. सकाळच्या घाईगडबडीत नाश्ता करण्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे. गव्हाच्या पिठापासून जाळीदार आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी आपण पाहणार आहोत.
साहित्य:
- गव्हाचे पीठ- १ वाटी
- बारीक रवा- १/२ वाटी
- कांदा- १ (बारीक कापलेला)
- गाजर- १/४ वाटी (बारीक कापलेले)
- सिमला मिरची- १/४ वाटी (बारीक कापलेली)
- बीटरूट- १/४ वाटी (बारीक कापलेला)
- कोथिंबीर- २ चमचे (बारीक कापलेली)
- हिरवी मिरची- ३
- मीठ चवीनुसार
- पाणी गरजेनुसार
साहित्य:
- एका भांड्यात गव्हाचे पीठ आणि रवा एकत्र करून घ्या.
- गव्हाचे पीठ आणि रवा जितके असेल तितके पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. गरज पडल्यास आणखी पाणी टाकू शकता. मिश्रण पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
- पीठ भिजवून झाल्यावर त्यात कापलेले गाजर, सिमला मिरची, बीट, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
- नंतर त्यात मीठ घालून तयार केलेले मिश्रण ५ ते १० मिनिटे भिजू द्या.
- पीठ भिजल्यानंतर आप्पे पात्राला आतून तेलाचा हात लावून तयार केलेले मिश्रण टाकून आप्पे शिजायला ठेवा.
- गव्हाचे आप्प्पे शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मंद आचेवर हे आप्पे शिजून द्यावे.
- गव्हाचे पौष्टिक आप्पे खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.
हे ही वाचा
‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत सुबोध आणि शिवानीचा अनोखा अंदाज
Angarki Sankashti Chaturthi 2024: धकाधकीच्या काळात श्रद्धा असूनही बाप्पाचे पूजन करता आले नाही तर….
Follow Us