नवरात्री स्पेशल बटाटा पुरी आणि दही साबुदाणा खिचडी रेसिपी जाणून घ्या

नवरात्री स्पेशल बटाटा पुरी आणि दही साबुदाणा खिचडी रेसिपी जाणून घ्या

नवरात्री मध्ये काहीजण ९ दिवस उपवास करतात आणि उपवासामध्ये नक्की कोणता पदार्थ बनवायचा हा प्रश्न पडतो. तसेच उपवासमध्ये हेल्दी पदार्थ खाणे आरोग्यास चांगले असते. नवरात्रीच्या उपवासामध्ये असे पदार्थ खाले पाहिजे जेणेकरून आपले पोट भरलेले राहील आणि जास्त भूक देखील लागणार नाही. तसेच तुम्ही उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी , राजगिऱ्याची पुरी , बटाट्याची भाजी , वरीचा भात , वरीची खिर असे पदार्थ आपण नेहमी बनवत असतो आणि सारखे सारखे तेच पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळा असाल. तर आज आम्ही तुम्हाला नवरात्री स्पेशल काही पदार्थ दाखवणार आहोत.

हे ही वाचा : उपवासाठी चविष्ट खमंग ढोकळा खास तुमच्यासाठी

 

रेसिपी –

नवरात्री स्पेशल बटाटा पुरीचे साहित्य –

तसेच बटाटा हा सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. बटाटा खाणे आरोग्यास उपयुक्त आहे. तसेच आपण बटाटा पासून वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. तर आज आम्ही तुम्हाला बटाटा पासून उपवासाठी बटाटा पुरी कशी बनवायची हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर जाणून घ्या साहित्य आणि कृती.

– बटाटा उकडून घेणे

– जिरे

– हिरवी मिरची

– चवीनुसार मीठ

– राजगिऱ्याचे पीठ

– तेल

कृती –

सर्व प्रथम बाउल घेणे आणि त्यामध्ये बटाटा उकडून खिसुन घेणे आणि त्यामध्ये जिरे , हिरवी मिरची , मीठ , राजगिऱ्याचे पीठ घालून मिश्रण एकत्रित करून मळून घेणे आणि त्याचे गोळे तयार करून हातांवर तूप लावून थापून घेणे आणि तेलामध्ये तळून घेणे तळून झाल्यानंतर पुऱ्या तुम्ही चिंचेची चटणी सोबत खाऊ शकता.

 

नवरात्री स्पेशल दही साबुदाण्याचे साहित्य –

साबुदाणा सर्वाना आवडतो . तसेच आपण साबुदाण्यासपासून साबुदाणा खिचडी , साबुदाणा वडे , इत्यादी पदार्थ बनवत असतो . तसेच साबुदाणा आरोग्यास खाणे चांगले आहे. साबुदाणा हा असा पदार्थ आहे की तो झटपट बनवता येतो. तर आज आम्ही तुम्हाला दही साबुदाण्याची रेसिपी दाखवणार आहोत.

– साबुदाणा भिजवून घेणे

– दही

– साखर

– मीठ

– शेंगदाण्याचा कूट

– जिरे

– मिरची

– तेल

कृती –

सर्वप्रथम साबुदाणा चांगला भिजून घेणे. त्यानंतर भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये दही , साखर , मीठ , शेंगदाण्याचा कूट घालून मिश्रण एकजीव करून घेणे. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर फोडणीला जिरे , मिरची घालणे आणि त्यामध्ये तयार झालेले साबुदाण्याचे मिश्रण घालणे. आणि चांगले एकजीव करून घेणे. त्यामुळे साबुदाण्याला आंबट , गोड तिखट असा स्वाद येतो.

हे ही वाचा :

उपवासाठी चमचमीत आणि स्वादिष्ट वरीची खिचडी

 

Exit mobile version