जाणुन घ्या… मसाले भात करण्याची रेसिपी

जाणुन घ्या…  मसाले भात करण्याची रेसिपी

मसाले भात खायाला सर्वांना आवडतो. तसेच मसाले भात करायला खूप सोप्पा आहे. मसाले भात आपण वेगवेगळया पद्धतीने देखील करू शकतो. मसाले भात मध्ये तुम्ही वेगवेगळया भाज्यांचा वापर देखील करू शकता. कारण भाज्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर युक्त तत्वे असतात. तर आज आम्ही या बातमीमधून तुम्हाला मसाले भात कसा करायचा ते सांगणार आहोत.

हे ही वाचा : चमचमीत चिकन रोल’ रेसिपी घ्या जाणुन

 

मसाले भात करण्याची रेसिपी –

मसाले भात करण्याचे साहित्य –

२ कप बासमती तांदूळ, १ टोमॅटो, १ बटाटा, आलं, १/४ कप उभी चिरलेली तोंडली, चार मिरच्या, दीड कप मटार, २ कप फ्लॉवर, २ कप गाजर, १ चमचा गोडा मसाला, १ लाल तिखट, १ हळद, तमालपत्र, जीरेपूड, धणे, १ चमचा तूप, ओलं खोबरं, कोथिंबीर बारीक चिरलेली, मीठ, तेल किंवा तूप.

 

मसाले भात बनवण्याची कृती –

सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घेणे . भाज्या कापून पाण्यात भिजत ठेवणे.

त्यानंतर कढईत तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये तमालपत्र, जीरं, राई, हिंग, टोमॅटो घालून चांगले परतून घ्या. नंतर त्यात सर्व भाज्या घालून परत एकदा परतून घ्या.

नंतर त्यात लाल तिखट,हळद,गोडा मसाला, तांदूळ घालून मिश्रण चांगले परतवून घेणे. तांदूळ चांगले परतवून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी, मीठ घालून वाफ काढून घ्या . आणि पाणी आटले की त्यात धणे, जीरं, तूप घालून मिश्रण एकजीव करून घ्या . त्यानंतर यात काजू आणि कोथिंबीर घाला.

त्यानंतर भात चांगला शिजवून घ्या भात शिजल्यानंतर वरून खोबरे घाला.

हे ही वाचा :

रात्रीच्या जेवणासाठी बनवा बटाटा टोमॅटोची खमंग ग्रेव्ही

 

Exit mobile version