सोलकडीचे पिण्याचे फायदे जाणून घ्या…

सोलकडीचे पिण्याचे फायदे जाणून घ्या…

कोकण, मालवणमध्ये प्रसिद्ध पेय पदार्थ म्हणजे सोलकडी. सोलकडी हा अगदी चवीला चविष्ट लागणार पेय आहे. सोलकडी आपण घरी देखील बनवू शकतो. सोलकडी बहुतेक लोकांना सेवन करायला आवडते. पण सोलकडीचे सेवन केल्याने आरोग्य निरोगी राहते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून सोलकडीचे फायदे सांगणार आहोत. जाणून घ्या.

कोकण, मालवणी मधील प्रसिद्ध पेय म्हणजे सोलकडी. सोलकडी म्हटल्यावर जिभेला पाणी सुटे. रविवारच्या दिवशी आपण चिकन, मटण बनवतो त्यावेळी त्यांच्यासोबत सोलकडी हा पदार्थ लागतोच. सोलकडीचे सेवन केल्याने जेवण पचनास मदत होते. तसेच कोकणात कोकम सरबत देखील प्रसिद्ध आहे. सोलकडी ही गुलाबी रंगाची असते आणि ती कोकमाच्या आंबट आगळापासून बनवली जाते. नारळाचे दूध आणि कोकमाचा आबंट आगळ एकत्र करुन त्यामध्ये मीठ कोथिंबीर घालून सोलकडी बनवली जाते. आणि जेवण लगेच पचावे म्हणून शेवटी सोलकडी दिली जाते. चिकनचे किंवा मटणाचे जेवण केल्यानंतर सोलकडी बनवण्याची पद्धत आहे. काहीजण तर नॉर्मल जेवण जरी बनवले असेल तरी सोलकडी बनवतात. आणि त्याचे सेवन करतात. सोलकडीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.

 

त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही सोलकडीचे सेवन करू शकता. अ‍ॅन्टीऑक्सिडंटमुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, आणि सुरकुत्या देखील कमी होतात.

कोकम मधील काही पोषक घटक मुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. आणि मधुमेहाचा धोका देखील कमी होतो. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणा मध्ये ठेवण्यासाठी सोलकडी खूप फायदेशीर आहे. आणि त्यामुळे हृदयाचा धोका देखील कमी होतो.

मांसाहारी पदार्थ पचायला थोडा वेळ लागतो म्हणून सोलकडीचे सेवन केले जाते. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सोलकडीचा वापर करा. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

थंडीच्या दिवसात कधी कधी जास्त प्रमाणात गरम देखील होते. त्यामुळे अन्न पचनास वेळ लागतो. अन्न बरोबर पचले नाही तर अनेक समस्या उद्भवत असतात. त्यासाठी तुम्ही सोलकडीचे सेवन करू शकता. पण सोलकडी कमी प्रमाणात सेवन करावी. जास्त प्रमाणात सेवन केल्याने सर्दी, खोकला होण्याचा धोका होऊ शकतो.

हे ही वाचा:

आज राज्यात हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद तर, चार जणांचा मृत्यू

रक्तातील साखर संतुलित करण्यापासून ते पचनशक्ती वाढवण्यापर्यंत: हिबिस्कस कोम्बुचाचे अनेक फायदे जाणून घ्या

 

Exit mobile version