मेथी खाण्याचे फायदे जाणून घ्या…

मेथी खाण्याचे फायदे जाणून घ्या…

आरोग्यासाठी मेथी खूप पौष्टिक मानली जाते. पण मेथीच नाही तर मेथीचे दाणे देखील खूप फायदेशीर आहे. सर्वी जण मेथीच्या दाण्याचे सेवन आवर्जून करतात. मेथीच्या दाण्यामध्ये ऍनिमिया देखील असते. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही मेथीचे सेवन करू शकता. मेथीच्या दाण्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया मेथी खाण्याचे फायदे.

हे ही वाचा : थंडीच्या दिवसात मुलांना द्या ‘हे’ पदार्थ….

 

मेथीचे दाणे पाण्यासोबत सेवन केल्याने आरोग्यावर खूप फायदे होतात आणि पोटाच्या समस्या देखील कमी होतात. मेथीचे दाणे आर्थरायटीस आणि साईटिका समस्यांवर रामबाण उपाय आहेत. मेथीचे दाण्याची पावडर आणि सुंठ पावडर गरम पाण्यात मिक्स करून सेवन केल्याने आरोग्यावर खूप फायदे होतात.

केसांमध्ये कोंडा झाला असेल, तर मेथीच्या दाण्यांची पेस्ट डोक्याला लावा. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवा. सुती कापडाने पुसा. कोंडा दूर होईल.

मेथीचे दाणे रात्रभर नारळाच्या कोमट गरम तेलामध्ये भिजत ठेवा. आणि सकाळी उठल्यावर तेच तेल घेऊन डोक्यावर मालिश करावी यामुळे डोके दुखी थांबते.

 

पोटातील गॅस आणि कफ कमी करण्यासाठी मेथी खूप फायदेशीर ठरते. रोज मेथीचे चूर्ण सेवन केल्याने आरोग्याला फायदा मिळतो. मेथी आणि सुंठाचे प्रमाण समान घेऊन त्यापासून तुम्ही चूर्ण तयार करू शकता. या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल.

जर तुम्हाला उच्चरक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही मेथीचे सेवन करू शकता. मेथीचे दाणे कोमट गरम पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. आणि मेथीचे दाणे चाऊन खाणे. यामुळे उच्चरक्तदाब कमी होण्यास मदत होईल.

मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.आणि हार्मोन संतुलित राहण्यास मदत होते. रोज मेथीचे दाणे सेवन केल्याने महिल्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल.

मेथीच्या दाण्यात भरपूर प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात. जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही मेथीचे सेवन करा.

हे ही वाचा : मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी करा हे उपाय…

 

Exit mobile version