spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जाणून घ्या अंजीर खाण्याचे फायदे..

अंजीर खाणे हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. अंजीरचा वापर पित्त, अपचन मुळव्याध, मधुमेह, कफ, फुफ्फुसासंबंधी सुजन यांच्या उपचारासाठी केला जातो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचे नियमित सेवन केले जाते. आजारपणात याचे नियमित पणाने सेवन केल्याने अनेक रोग बरे होतात. अंजीर हे ओले आणि सुके या दोन प्रकारात उपलब्ध आहेत.

हे ही वाचा :

मुंबईच्या प्रभादेवीमध्ये भीषण आग

 

अंजीरमध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. अंजीरच्या फळामध्ये लोह, कॅल्शिम, फायबर व्हिटॅमिन ए हे सर्वे पोषक तत्वे असतात. अंजीरमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. मात्र ओले अंजीर हे सुक्या अंजिर पेक्षा जास्त पौष्टिक असते.

सुका मेवा म्हणून अंजीर सर्वांचे फारच आवडते असते. लोक यांना आवडीने खातात. यापासून आरोग्यदायी लाभही मिळतो. अंजीरला बदाम, मनुके, काजू आणि खजूर यां मेव्यासोबत मिसळूनही खाल्ले जाते.

अंजीर खाल्याने पित्ताचा त्रास कमी होतो. पचनक्रिया ही सुधारते अंजीरपासून अनेक औषधे देखील बनवली जातात. सकाळी सकाळी उठल्यावर अनुशापोटी दुधात सुके अंजीर मिक्सकरून पिल्याने रक्तवाढीस मदत होते आणि रक्तदाब ही देखील नियंत्रित राहतो.

 

सकाळ सकाळ अंजीर फळ खाल्याने शारीरिक थकवा दूर होतो. अशक्तपणा जाणवल्यास तुम्ही अंजीर फळाचा वापर करू शकता. अंजीरमुळे थकवा आणि दमाचा त्रास कमी होतो.

अंजीर जास्त प्रमाणात खाऊ नये. जास्त प्रमाणात खाल्याने आरोग्यावर त्याचे जास्त परिणाम होतात.

ज्यांना हृदयविकाराचा समस्या असतात त्यांनी अंजीरचा वापर करू शकता. सुके अंजीर आपले रक्तदाब नियंत्रित करून हृदयाला होणाऱ्या त्रासाला कमी करतात. हृदयातील नलीकांमधील अडथळे दूर करण्यात मदत करते.

शरीरासाठी फायबर हे फारच महत्वाचे असते. जर शरीरात योग्य प्रमाणात फायबर असेल तर शरीराच्या अनेक समस्या कमी करतात. अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. शरीरात फायबरचे प्रमाण योग्य असेल तर अरबट चरबट खाण्याची फारशी इच्छा होत नाही. ज्यांना वजन कमी करायचे असते अशांना चांगले फायबर शरीरात जाणे गरजेचे असते. अंजीर मुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते.

हे ही वाचा :

देवेंद्र फडणवीस आमचे हिंदुहृदयसम्राट – नितेश राणे

 

Latest Posts

Don't Miss