spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Green tomatoes हिरवे टोमॅटो खाण्याचे जाणून घ्या फायदे

टोमॅटोचा  (Green tomatoes) वापर आपण दैनंदिन जीवनात जेवण करताना वापरतो. जेवणात टोमॅटोचा वापर नसेल तर जेवण रुचकर लागत नाही. टोमॅटो शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. टोमॅटोच्या किमतीवरूनच तुम्हाला माहिती की वर्षभरात टोमॅटोच्या किंमतीत चढउतार होत असतात. काहीवेळा टोमॅटो इतके महाग होतात की घेताना पण विचार करावा लागतो. पण अनेक आजारांपासून बचाव करण्यासाठी टोमॅटो गुणकारी आहे. सर्व जण टोमॅटो (tomato) वापरतात. तसेच टोमॅटोपासून आपण भाजी (vegetables) चटणी (chutney) , टोमॅटो (tomato) सूप बनवत असतो. तसेच काही लोक टोमॅटोचा वापर मासे बनवतांना देखील करतात. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म देखील आढळून येतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला ग्रीन टोमॅटो (Green tomatoes) चे फायदे माहित आहे ?

हिरव्या टोमॅटो मध्ये जास्त प्रमाणात पोषक घटक आढळून येते. तसेच ग्रीन टोमॅटोमध्ये (Green tomatoes)  व्हिटॅमिन सी (Vitamin C) , व्हिटॅमिन ए (Vitamin A,) कॅल्शियम (Calcium) पोटॅशियम (Potassium) असे घटक देखील असतात. जे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती (Immunity) वाढण्यास मदत करते.

 

चुकीच्या जीवशैलीमुळे आणि खराब जीवनशैली मुळे लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या वाढत चाली आहे. जर तुम्ही ग्रीन टोमॅटोचे (Green tomato) सेवन केले तर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवणार नाही. कारण त्यामध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास (control blood pressure) मदत करते.

ग्रीन टोमॅटोचे (Green tomatoes ) सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. म्हणून नियमितपणे ग्रीन टोमॅटोचे (Green tomato) सेवन करा. हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा-कॅरोटीन असते जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी (eye sight) देखील चांगली राहते. तसेच तुम्ही डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचा (Green leafy vegetables) वापर देखील करू शकता. म्हणून नियमितपणे टोमॅटोचे सेवन करणे गरजेचे आहे, आणि कोणतेही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss