जाणून घ्या मध खाण्याचे फायदे…

जाणून घ्या मध खाण्याचे फायदे…

अनेक जणांना गोड पदार्थ खायाला खूप आवडतात. पण काही जण गोड पदार्थ कमी सेवन करतात. कारण वजन वाढेल , रक्तातील साखरेचे प्रमाण वाढेल, या साठी काहीजण गोड पदार्थ कमी प्रमाणात खातात. पण काही गोड पदार्थाचे अनेक फायदे देखील आहेत. तसेच यामध्ये मध (Honey) देखील आलंच. मधाचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. तसेच मध हा अत्यंत गुणकारी आहे. चला तर मग जाणून घेऊया मधाचे फायदे.

हे ही वाचा : मोबाईलच्या अतिवापर केल्याने, आरोग्यावर होतील परिणाम

 

मध (Honey) हा एक आयुर्वेदिक घटक आहे. तो बाजरात सहजपणे उपलब्ध असणारा पदार्थ आहे. मधाला सुपरफूड (Superfood) देखील म्हटले जाते, कारण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते. तसेच पावसाळयात मधाचे सेवन करणे फार उपयुक्त ठरते.

नियमितपणे मधाचे सेवन केल्याने शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

बहुतेक लोकांना भूक न लागण्याची समस्या असते. तर अशा व्यक्तीने मधाचे सेवन करावे. मधाचे सेवन केल्याने भूक लागण्यास मदत होते.

मधाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते. तसेच मधामुळे रक्त शुद्ध करता देखील येते.

 

त्वचेसाठी देखील मध उत्तम आहे. तसेच त्वचा तेलकट असल्यास चेहऱ्याला मध लावा. आणि १० मिनिटे मसाज करा.

यामुळे त्वचेला ग्लो येतो. आणि त्वचा अधिकच सुंदर दिसायला लागते. किंवा तुम्ही यामध्ये लिंबाचे २ थेंब देखील मिक्स करू शकता.

मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण होते.

नियमित पणे मध सेवन केल्याने मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.

उन्हाळ्यामध्ये पाण्यात मध मिक्स करून पिल्याने पोट साफ होण्यास मदत होते.

तसेच हिवाळामध्ये सर्दी , खोकला , कफ यासारख्या समस्या उद्भवतात. त्यासाठी कोमट गरम पाण्यात मध मिक्स करून पिणे यामुळे लगेच फरक जाणवतो. म्हणून मधाचे सेवन करावे.

हे ही वाचा : 

वजन वाढतंय… करा ‘हे’ सोपे उपाय

 

Exit mobile version