जाणून घ्या… ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे

ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते.

जाणून घ्या… ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे

ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. जे शरीरातील कॅल्शियम शोषण्यास मदत करते. मजबूत हाडांसाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. ज्वारीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्याने आपली हाडे मजबूत होतात. ज्वारीचा आहारात समावेश केल्याने संधिवाताचा त्रास कमी व्हायला मदत होते. ज्वारीच्या भाकरीचा रोज आहारामध्ये वापर करा. ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळेच कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यविषयक तक्रारी कमी असतात.

हे ही वाचा : जाणून घ्या बटाट्याचे फायदे

 

ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ती आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

ज्यांना एनीमियाचा त्रास आहे त्यांनी नक्की ज्वारीची भाकरी खाणे. ज्वारीच्या भाकरीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे एनीमियाचा रूग्णांनी रोज भाकरी खावी.

तंदूर रोटी, नान यांच्यामुळे मराठमोळ्या ज्वारीच्या भाकरीचं आहारात पाहुण्याचं स्थान निर्माण झालंय. आहारात ज्वारीची भाकरी नसल्यामुळे ज्वारीतून मिळणाऱ्या पोषक तत्वाचा शरीरात अभाव जाणवतो.

वाढत्या प्रदुषणामुळे आणि दगदगीच्या आयुष्यामुळे महिलांमध्ये मासिक पाळी आणि गर्भाशयाच्या समस्या भऱपूर प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे तुम्ही आहारामध्ये ज्वारीचा समावेश करू शकता.

लठ्ठपणामुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. त्यासाठी शरीराची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ज्वारीच्या भाकरीच्या समावेश करू शकता.

 

ज्वारीचे सेवन रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असते.

ज्वारीचा समावेश केल्यानी रक्तातील साखरीचे प्रमाणवर नियंत्रण ठेवता येते. आणि किडनी स्टोनसारखा आजार असेल तर तुम्ही भाकरी खाणे.

मूळव्याध हा आजार असल्यास ज्वारीचा भाकरीचा समावेश करा.

ज्वारीमध्ये फायबर, आयरन, कॉपर, कॅल्शिम हे जास्त प्रमाणात असते. मजबूत हाडांसाठी कॅल्शिम खूप गरजेचे आहे. भाकरीचा समावेश केल्यानी स्नायू आणि हाडे मजबूत राहतात.

मधुमेहाच्या रुग्णांनी रोज १ तरी भाकरीचे सेवन केले पाहिजे. ज्वारीमुळे इंसुलियांचे प्रमाण कमी होते आणि मधुमेह सारखा आजाराचा धोका कमी होतो

हे ही वाचा :

सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका का येतो ? जाणून घ्या कारणे

 

Exit mobile version