जाणून घ्या संत्री खाण्याचे फायदे…

जाणून घ्या संत्री खाण्याचे फायदे…

नागपूरची संत्री जगप्रसिद्ध आहेत. आरोग्यासाठी संत्र्याचे खूप फायदे आहेत . सर्दीपासून संरक्षण आणि त्वचा सुंदर बनवण्यापासून संत्री खाण्याचे अनेक फायदे आहेत. संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. संत्र खाल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. संत्र खाल्याने वजन नियंत्रण ठेवण्यात मदत होते. संत्र्याचे नियमित सेवन केल्याने त्वचा, छाती, फुफ्फुस, तोंड, पोट इत्यादींचा कर्करोग टाळण्यास मदत होते. तसेच संत्र्यापासून अनेक पदार्थ बनवता येते. जाणून घेऊया संत्री खाण्याचे फायदे.

हे ही वाचा : चॉकलेट केक बनवण्याची रेसिपी

 

संत्री खाण्याचे फायदे –

संत्री नियमितपणे सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच सर्दी, खोकला, नाक अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी चा समावेश असणे गरजेचे आहे.

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. याचा परिणाम तुमचा रक्तदाबावर होतो. त्यातील मॅग्नेशियममुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.

मधुमेह असलेल्या व्यक्ती देखील संत्री खाऊ शकता. यामधील साखरेचे प्रमाण फारच कमी आहे. शिवाय त्यातील फायबर्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

वजन नियंत्रणात राहण्यासाठी कमी कॅलरिज आणि फायबरयुक्त आहाराची गरज असते. संत्र्यामध्ये फायबर्सचे प्रमाण नक्कीच जा्स्त आहे. शिवाय त्यामुळे तुमच्या शरीराला कॅलरिजदेखील कमी मिळतात. म्हणूनच वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज संत्रीचे सेवन करा.

संत्र्यांच्या सेवनामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात.

त्वचा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही संत्री वापरा शकता. कारण संत्रीमध्ये अँटी ऑक्सिंडट हे गुणधर्म असतात.

त्वचा सुंदर दिसण्यासाठी तुम्ही संत्र्याचा फेसपॅक देखील लावू शकता.

संत्री खाण्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो.

संत्री मुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते.

तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही आहारात व्हिटमिन सी युक्त संत्र्याचा वापर नक्कीच करू शकता.

केस खूप गळत असतील किंवा तुमचे केस पातळ होत असतील तर संत्री खाणे फायदेशीर ठरू शकते. हे तुम्हाला तुमच्या केसांच्या समस्येपासून मुक्ती देखील देऊ शकते. रोज संत्र्याचा रस प्यायल्याने केस दाट आणि रेशमी होतात.

हे ही वाचा :

घरच्या घरी फ्रेंच टोस्ट बनविण्याची रेसिपी

 

Exit mobile version