spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जाणून घ्या बटाट्याचे फायदे

बटाटे पौष्टिकतत्त्वांनी भरलेले असेत. बटाट्यामध्ये सोडा, आणि व्हिटॅमिन ए आणि डी परिपुर्ण प्रमाणात असते. आपण उपवासासाठी अनेक पदार्थ बनवतो आणि तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर तुम्ही उपवासासाठी बटाट्याची भाजी, किंवा बटाटा शिजवून तुम्ही मीठ घालून खाऊ शकता. बटाटयाच्या साली मध्ये प्रोटीन आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात. त्यामुळे योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात बटाटे खान खरं तर तुम्हाला फायदेशीर ठरते. त्यामुळे बटाटा खूप उपयुक्त आहे. बटाट्या मध्ये विटामिन सी, विटामिन बी६,पोटॅशियम, मॅग्नेशियम,झिंक आणि फॉस्फरस आढळते. तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे घटक महत्त्वाचे ठरतात.

हे ही वाचा : मासिक पाळीच्या वेदना टाळण्यासाठी करा घरगुती उपाय

 

बटाट्याचे फायदे –

 

बंटाट्यातील लोह शरीरातील रक्तवाढीसाठी पूरक ठरतं.

बटाट्यातल्या कॅल्शियममुळे शरीरातील हाडं मजबूत होतात.

बटाटाचे साली सोबत सेवन केल्यास आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. किंवा बटाटा उकडलेली पाणी पिल्याने देखील शरीर निरोगी राहते.

अनेकदा विविध आजारांमुळे डोळ्याभोवती काळी वर्तळ तयार होतात. अशावेळी बटाटाचे कापे डोळ्यांवर ठेवावा. यामुळे डोळ्याभोवतीची काळी चर्तुळ नाहीशी होतात.

तुम्हाला जर किडनी देखील समस्या असतील किंवा तुम्हाला सारखी सारखी लघवी होत असेल तर तुम्ही रोजच्या आहारामध्ये बटाट्याचा समावेश करू शकता.

जर तोंड आले असेल तर बटाटा उकडून खा.

जर अशक्तपणा येत असेल तर अशात तुम्ही बटाट्याचं सेवन करू शकता.

जेव्हा तुमच्या आहारात पुरेसे पोटॅशियम नसते, तेव्हा तुमचे शरीर अतिरिक्त सोडियम टिकवून ठेवते आणि जास्त सोडियम तुमचे रक्तदाब वाढवते. पोटॅशियम समृद्ध आहार रक्तदाब कमी करण्यास, हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता.

तुम्ही बटाट्याचा वापर तुमच्या उपवासासाठी देखील सुद्धा करू शकता.

हे ही वाचा : 

आरोग्यासाठी गाजर खाण्याचे फायदे

 

Latest Posts

Don't Miss