Friday, September 27, 2024

Latest Posts

नवरात्रीच्या उपवासात कोणते पदार्थ खावे, कोणते खाऊ नये जाणून घ्या सविस्तर माहिती

नवरात्री उत्सवाला आता काहीच दिवसात सुरुवात होणार आहे. हिंदू भक्त देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी नऊ दिवस उपवास केला जातो.

नवरात्री उत्सवाला आता काहीच दिवसात सुरुवात होणार आहे. हिंदू भक्त देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी नऊ दिवस उपवास केला जातो. उपवासाचे दिवस कमी जास्त असू शकतात.काही लोक सर्व नऊ दिवस उपवास करतात, तर काही भक्त असे आहेत जे नवरात्रीचे पहिले दोन किंवा शेवटचे दोन दिवस असे जोड्यांमध्ये उपवास करतात.नवरात्रीच्या उपवासात काही स्त्रिया पूर्ण नऊ दिवस उपवास करतात. यामध्ये काही फक्त पाणी पिऊन तर काही फळे खातात. शिंगाड्याचे पकोडे, साबुदाणा वडा आणि साबुदाणा खिचडी यांसारखे अनेक नवनवीन पदार्थ बनवले जातात. पण काही स्त्रियांना हेच माहित नसत नक्की उपवासाच्या दिवशी काय खावे आणि काय खाऊ नये. चला तर जाणून घेऊया उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ खावे आणि खाऊ नये.

रात्रीच्या वेळेस उपवासाच्या दिवशी बहुतेक लोक भाज्या खातात. जसे की बटाटे, रताळे, अरबी, कचलू, सुरण किंवा यम, लिंबू, कच्चा किंवा अर्ध पिकलेला भोपळा, कच्चा भोपळा, पालक, टोमॅटो, काकडी, गाजर इत्यादी पदार्थांचे सेवन केले जाते. नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये गहू तांदूळ हे नियमित खाऊ नये. तसेच शिंगाड्याचे पीठ किंवा राजगिरा पीठ खाऊ शकता. खिचडी, ढोकळा किंवा खीर बनवताना तांदूळा ऐवजी वरईचे तांदूळ वापरू शकता. साबुदाणा हे नवरात्रीतील आणखी एक प्रमुख अन्न आहे जे खीर, वडे आणि पापड बनवण्यासाठी वापरले जाते. नवरात्री उत्सवाच्या काळात तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकता. काहीजण नऊ दिवस फक्त दूध आणि फळे खाऊन राहतात. त्यामुळे दररोज ताजी फळे खावी. सामन्यात नवरात्रीमध्ये जेवणात मीठ वापरत नाही. मसाल्यांमध्ये तुम्ही जिरे किंवा जिरे पावडर, काळी मिरी पावडर, हिरवी वेलची, लवंग, दालचिनी, अजवाइन, काळी मिरी, कोरडे डाळिंब, कोकम, चिंच आणि जायफळ वापरू शकता. काही लोक ताजी कोथिंबीर, लाल मिरची पावडर, सुक्या कैरीची पावडर, चाट मसाला हे मसाले वापरू शकता. नवरात्रीच्या उपवासात दूध आणि खवा जास्त प्रमाणात वापरला जातो.

नवरात्रीच्या उपवासात फास्ट फूड, कॅन केलेले अन्न आणि कांदा किंवा लसूण हे पदार्थ खाऊ नये. नवरात्रीचा उपवास करणाऱ्या भाविकांनी शेंगा, मसूर, तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लोअर, गव्हाचे पीठ आणि रवा खाणे टाळावे. नॉन-इटेरियन फूड, अंडी, अल्कोहोल, स्मोकिंग आणि ड्रिंक्स देखील टाळले पाहिजेत.

Latest Posts

Don't Miss