ग्रीन टी च्या फायद्यांविषयी घ्या जाणून

‘अंग गोठवणारी थंडी आणि वाफाळता चहा’ हे एक अजब रसायन आहे. चहा हा अनेकांचा विकपॉंईट असतो. आजकाल वजन कमी करण्यासाठी ‘मसाला चहा’ ऐवजी ‘ग्रीन टी’ घेण्याला प्राधान्य दिलं जातं.

ग्रीन टी च्या फायद्यांविषयी घ्या जाणून

‘अंग गोठवणारी थंडी आणि वाफाळता चहा’ हे एक अजब रसायन आहे. चहा हा अनेकांचा विकपॉंईट असतो. आजकाल वजन कमी करण्यासाठी ‘मसाला चहा’ ऐवजी ‘ग्रीन टी’ घेण्याला प्राधान्य दिलं जातं. ग्रीन-टी हे एक ‘आरोग्यदायी पेय’ म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे.

आपण सर्व जण जाणतो, ग्रीन टी हे शरीरासाठी खुप उपयुक्त आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिरोधक असतात जे कर्करोगाच्या समस्या दूर करू शकते. ग्रीन टी मधील प्रतिरोधके आपल्या पेशीमध्ये मृत होणाच्या समस्येला दूर करतो त्यामुळे पेशी मृत पावण्याचे प्रमाण कमी होते. हृदयावरील हल्ल्याची समस्या पण दूर करण्यास मदत करते. संपूर्ण शरीराच्या स्वास्थासाठी ग्रीन टी फायदेशीरच ठरते.

ग्रीन टी चे फायदे :-

१. वजन कमी करणे :- ग्रीन टी शरीरातील पाचन तंत्रास वाढवतो. अतिरिक्त चरबीस शरीरातून बाहेर टाकतो. पोलीफिनोन तत्वामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर टाकता येते. त्यामुळे रक्तप्रवाह विकसित होते. व वजन कमी करण्यास मदत होते.

२. मधुमेह :- ग्रीन टी च्या सेवनामुळे रक्तामधील साखर कमी करता येते. त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी हि एक वरदान सिद्ध होते. हे इन्सुलिन ला नियंत्रित करतो त्यामुळे मधुमेहात त्रास कमी होतो.

३. ग्रीन-टी तुम्ही एक नैसर्गिक टोनर म्हणून देखील वापरु शकता :- जर तुमची त्वचा नितळ आणि चमकदार नसेल तर मुळीच चिंता करु नका. यासाठी आता पार्लरमध्ये वायफळ खर्च करण्याची देखील गरज नाही. फक्त ग्रीन-टीने तुमचा चेहरा स्वच्छ करा. मग बघा चेहरा कसा नितळ दिसू लागेल. कारण ग्रीन-टीमुळे तुमच्या चेहऱ्यावरील घाण निघून जाते. त्वचेची छिद्रं मोकळी होतात. सहाजिकच तुम्ही आणखी सुंदर दिसू लागता.

४. दातांमधील सडने :- ग्रीन टी पिल्याने दातातील हानिकारक ब्याक्टेरीया आणि वायरस कमी होतात त्यामुळे दात सडत नाहीत व दात स्वस्थ ठेवले जातात.

५. तेलकट त्वचेपासून बचाव होतो :- जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुमच्यासाठी ग्रीन-टी फारच फायदेशीर आहे. कारण ग्रीन-टीमध्ये टॅनिन असतं. ज्यामुळे त्वचेतील तेलनिर्मिती रोखली जाते. नियमित ग्रीन-टी घेतल्याने तुमच्या त्वचेचा बॅलन्स उत्तम राहतो. तुमची त्वचा अधिक मऊ आणि चमकदार दिसू लागते.

ग्रीन टी साठी लागणारी सामग्री :-

ग्रीन टी ची पत्ती – १ चम्मच ( रेडीमेड प्याक मधील )

पाणी – १ कप

स्वादानुसार शहद

स्वादानुसार लिंबू रस

ग्रीन टी बनविण्याचा विधी:- १ कप पाणी गरम करावे. पाणी गरम करतेवेळी जास्त गरम करू नये. उकडन्याआधीच बंद करावे. आता यात १ चम्मच ग्रीन टी ची पत्ती टाका. २-३ मिनिटे मिळवत राहावे. नंतर चहाच्या कपाट गाळून घ्या. लिंबू रस व शहद स्वादानुसार टाकून चांगले ढवळा व गरमागरम ग्रीन टी चा आनंद घ्या.

हे ही वाचा:

खजूर खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का ?

तुळशीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version