दिवाळीनिमित्त चविष्ट खारे शंकरपाळी कशी बनवावी, जाणून घ्या कृती

दिवाळीनिमित्त चविष्ट खारे शंकरपाळी कशी बनवावी, जाणून घ्या कृती

दिवाळी या सणाला आजपासून सुरुवात झाली आहे. तसेच दिवाळीचे फराळ म्हटले की काही लोक १५ दिवस अगोदरच फराळ बनवायला सुरुवात करतात. दिवाळी हा असा सण आहे की जो घरात आनंद घेऊन येतो. दिवाळी मध्ये जर तुम्ही अजून ही पदार्थ बनवत असाल तर खारे शंकरपाळी हा पदार्थ नक्की करून पाहा. तसेच आपण दिवाळीत नेहमीचे पदरच बनवत असतो. आणि तेच तेच पदार्थ खाऊन आपण कंटाळतो. तसेच काही जण नवीन पदार्थ खाण्यासाठी खूप आनंदी असतात. चला तर मग जाणून घेउया शंकरपाळी कशा पद्धतीने बनवता येईल.

हे ही वाचा:  Diwali 2022 : यंदाच्या दिवाळीला घर सजवा ‘या’ खास दिव्यांनी

 

शंकरपाळी मध्ये खूप प्रकार असतात. जसे की गोड शंकरपाळी , तिखट शंकरपाळी, इत्यादी प्रकार पाहायला मिळतात. शंकरपाळी हा असा पदार्थ आहे जो की आपल्याला वेगवेगळया पद्धतीने बनवता येतो. शंकरपाळी हा पदार्थ आपल्याला रव्या पासून , मैदापासून बनवता येतो. शंकपाळी हा पदार्थ दिवाळीच्या फराळ मध्ये खूप महत्वाचा पदार्थ आहे. आणि हा सर्वंनाच आवडतो. तसेच शंकरपाळी हा पदार्थ तुम्ही चहासोबत , दुधासोबत , किंवा असा सुखा देखील खाऊ शकता. शंकरपाळी बनवताना खूप काळजी घ्यावी लागते. तसेच बाकीचे पदार्थ देखील फुटू नये म्हणून त्यांची पण काळजी घेतली जाते.

खारे शंकरपाळी बनवण्याची रेसिपी –

साहित्य –

एक वाटी मैदा

पाव वाटी रवा

कस्तुरी मेथी

काळे तिळ

मिठ

ओवा

जिरं

तेल

 

कृती –

सर्व प्रथम एका भांडयात मैदा घालावा त्यानंतर रवा घालावा आणि मिक्सकरून घ्यावे. मिक्स केल्यानंतर त्या मध्ये ओवा घालावा. आणि परत एकदा मिश्रण मिक्सकरून घ्यावे. त्यानंतर कस्तुरी मेथी, काळे तिळ ,जिरे आणि पिठात चवीनुसार मीठ घालुन सर्व एकजीव करून घ्यावे. त्यानंतर मिश्रणामध्ये थोडे थोडे तेल घालून पीठ मळून घ्यावे. पीठ चांगले मळून घ्यावे पीठ मळताना कोमट गरम पाणी वापरावे. पीठ मळून झाल्यानंतर ५ मिनिटे बाजूला ठेवणे. ५ मिनिटे झाल्यानंतर त्याचे मोठे गोळे तयार करून घेणे आणि लाटून घेणे. लाटून झाल्यानंतर त्याचे कापे पाडून घेणे आणि तेलामध्ये चांगले तळून घेणे. असा प्रकारे गरमागरम शंकरपाळी खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा:  

शिंदे गटात वाद :आमदाराने साधला आपल्याच मंत्र्यावर निशाणा

 

Exit mobile version