पुरणपोळी बनवायला शिकत आहात ? तर ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

पुरणपोळी बनवायला शिकत आहात ? तर ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

puranpoli tips : महाराष्ट्रीयन संस्कृतीत काही चांगले घडले किंवा कोणताही कार्यक्रम असो गोड हा पदार्थ बनवला जातो. तसेच गोड या पदार्थामध्ये पुरणपोळी ही खूप जास्त प्रमाणात बनवली जाते. लुसलुशीत आणि मऊ पुरणपोळी (puranpoli) ही खायाला सर्वांना आवडते. तसेच आजकाल पुरणपोळी ही आपल्याला हॉटेलमध्ये देखील विकत मिळते. खास करून होळीच्या दिवशी नेवैद्य म्हणून पुरणपोळी देवाला दाखवली जाते. पुरणपोळी (puranpoli )ही वेगवेगळया पद्धतीने बनवली जाते. तसेच पुरणपोळी बनवणे जरी सोपी असली तर ती बनवताना काही गोष्टीची काळजी घ्यावी लागते. तर आज आम्ही तुम्हाला पुरणपोळी बनवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी या बद्दल सांगणार आहोत.

तुम्हाला जर पांढऱ्या शुभ्र पुरणपोळ्या (puranpoli ) हव्या असतील तर तुम्ही मैदाच्या पिठापासून देखील पुरणपोळी बनवू शकता. तसेच तुम्ही पुरणपोळी बनवताना मैदामध्ये गव्हाचे पीठ मिक्स करून देखील मऊ पुरणपोळी बनवू शकता.

तुम्ही जर मैदापासून पुरणपोळी बनवत असाल तर त्यासाठी मैदा हलक्या हाताने मळून घ्या मळताना थोडा वेळ जाईल पण पुरणपोळी लुसलुशीत आणि मऊ होण्यास मदत होईल.

 

त्यानंतर पुरणपोळी (puranpoli ) लाटांना हलक्या हाताने लाटून घ्या जेणे करून पुराणपोळी (puranpoli ) मधील पुरण बाहेर येणार नाही. पुरणपोळी लाटताना चारही बाजूने लाटून घ्या एका बाजूने लाटू नका. पुरणपोळी छान गोल आकारात लाटून घ्या आणि छान शेकून घ्या शेकून घेताना त्यावर तूप हलक्या हाताने हळू पुरणपोळीवर सोडून द्या. पुरणपोळी तुम्हाला एकदा जमली की ती नीट करता येईल. आणि खाण्यासाठी खमंग आणि मऊ पुरणपोळी तयार आहे.

पुरणपोळी (puranpoli tips) शेकताना मंद आचेवर शेकणे. पुरणपोळी दोन्ही बाजूने नीट शेकून घेणे. पुरणपोळी शेकून झाल्यानंतर एका प्लेट मध्ये कागद ठेवून देणे आणि त्यामध्ये पुरणपोळी ठेवणे आणि हलके गार होऊन देणे.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version