spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Maharashtrian Pithla Recipe भाकरी सोबत घ्या गावरान पिठल्याची चव

Maharashtrian Pithla Recipe : थंडीत चमचमीत तिखट पदार्थ खायाला आवडतात. थंडीच्या दिवसात भाकरी आणि पिठलं खायाला खूप चविष्ट लागते. तसेच भाकरीचे अनेक प्रकार आहेत. आणि थंडीच्या दिवसात भाकरी आणि पिठलं खाण्याची मजाच वेगळी असते. पिठलं वेगवेगळया प्रकारे देखील बनवले जाते. काही लोक लाल तिखट वापरून पिठलं बनवतात तर काही लोक हिरव्या मिरच्या वापरून पिठलं (Taste of Gavran Pithla) बनवतात. बाजरीची भाकरी या सारखे पदार्थ थंडीमध्ये सेवन केले जाते. आणि हे पदार्थ चवीला देखील मस्त लागतात. तसेच बाजरीच्या भाकरी मध्ये व्हिटामीन बी, फायबर्स , अँटी- ऑक्सिडंट असे घटक आढळून येतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. बाजरीची भाकरी तुम्ही डाळ भाजी लोणचे सोबत देखील खाऊ शकता. यामुळे जेवणाला एक वेगळीच चव येते.तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून गावरान पिठल कसे बनवायचे या बद्दल सांगणार आहोत, जाणून घ्या मग रेसिपी.

साहित्य

२ चमचे तेल

१/२ टीस्पून मोहरी

१/२ टीस्पून जिरे

१/२ टीस्पून राई

हिंग

कढीपत्ता

बारीक चिरलेला कांदा

१ कप बेसन

पाणी गरजेनुसार

लसूण पाकळ्या

हिरव्या मिरच्या

हळद

गरम मसाला

चवीनुसार मीठ

कोथिंबीर

 

कृती

सर्व प्रथम कढईत तेल गरम करून घेणे आणि त्यामध्ये हिंग, जिरे, बडीशेप, मोहरी घालून घेणे. नंतर त्यामध्ये कढीपत्ता लसूण हिरवी मिरची हळद घालून घेणे आणि शिजवून घेणे, शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घेणे आणि कांदा चांगला परतवून घेणे. कांदा चांगला लाल झाला की त्यामध्ये बेसन आणि पाणी घालून घ्या. बेसन चांगले शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये मीठ आणि तिखट घालून चांगले शिजवून घ्या आणि गरमागरम पिठलं खाण्यासाठी तयार आहे. तसेच तुम्ही हे पिठलं भाकरी सोबत खाऊ शकता. भाकरी पिठलं दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला बनवून त्याचे सेवन करू शकता.

हे ही वाचा :

उरलेल्या भातापासून बनवा हॉटेल सारखा फ्राईड राईस

 

 

Latest Posts

Don't Miss