गव्हाच्या पिठापासून बनवा ३ वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आणि करा सकाळचा नाश्ता स्पेशल

गव्हाच्या पिठापासून बनवा ३ वेगवेगळ्या प्रकारचे पराठे आणि करा सकाळचा नाश्ता स्पेशल

रोज सकाळी उठल्यावर मुलांच्या आणि सगळ्यांच्या नाश्त्याला काय करायचे असा प्रश्न आपल्याला पडतो . मुलांनानाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ लागतात . वेगवेगळे पदार्थ असतील तर मुले आवडीने खातात . मेथीचे किंवा बटाट्याचे पराठे असे काही ना काही वेगळे करतो. लहान मुलं काय किंवा मोठे काय हॉटेलमध्ये गेल्यावर जितक्या आवडीने आणि पोटभर जेवतात तेवढे घरात किंवा डब्यात दिल्यावर जेवत नाही . तर आज आम्ही तुम्हाला सकळायचा नाश्त्यासाठी काही पदार्थ दाखवणार आहोत .

हे ही वाचा : सफरचंद खाण्याचे फायदे

 

मलाई पराठा –

कणीक थोडे मऊ मळून घ्या कणिक मळून झाल्यानंतर त्याचे गोळे तयार करून घ्या .

गोळे तयार करताना त्यात साजूक तूप घालून घ्या .

गोळे तयार झाल्यानंतर त्याला चारही बाजूने घडी घालून घ्या .

मग ही घडी लाटून जाडसर पराठा करा.

चौकोनी आकाराचा हा पराठा तव्यावर चांगला भाजून घ्या आणि भाजतानाही याला तूप लावा.

 

बटर लसूण पराठा –

कणिक मळून घ्या आणि त्याचे गोळे तयार करून घ्या .

गोळे तयार करताना त्यामध्ये काळे तीळ, बारीक केलेला लसूण आणि कोथिंबीर घाला.

आणि आडव्या पद्धतीने पोळी लाटून घ्या .

पोळी लाटून झाल्यानंतर तिला शेकून घ्या आणि वरून बटर लावून घ्या .

लच्छा पराठा –

कणीक थोडे मऊ मळून घ्या कणिक मळून झाल्यानंतर त्याचे गोळे तयार करून घ्या .

पिठाचा गोळा तयार झाल्यानंतर त्याला रोल आकारामध्ये तयार करून घ्या .

रोल आकारामध्ये तयार झाल्यानंतर त्याला लाटून घ्या .

लाटून झाल्यानंतर त्याला चांगले शेकून घ्या आणि वरून तूप किंवा बटर लावून घ्या आणि वरून शिमला मिरची , टोमॅटो शिजवुन वरून घालून घ्या .

हे ही वाचा :

स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे

 

Exit mobile version