spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नवरात्रीमध्ये बनवा स्पेशल पनीर बुर्जी , कांदा आणि लसूण न वापरता

नवरात्री हा सण ९ दिवसाचा असतो . नवरात्री म्हटल्यावर दांडिया आणि उपवासाचे पदार्थ किंवा वेगवेगळ्या फळांचे रस हे सर्व डोळ्यांसमोर येते. नवरात्री हा सण भक्तीभावाने केला जातो . नवरात्री म्हणजे आदी शक्तीचे रूप . पण काही स्त्रिया नवरात्री मध्ये भक्तिभावाने पूजा करतात . आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही . आणि आजरांना निमंत्रण देतो . तसेच नवरात्रीमध्ये नेमका रोज कुटला पदार्थ बनवायचा हा प्रश्न सर्वांना पडतो . आपण उपवासामध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ खाऊशी वाटतात . पण उपवासामध्ये कांदा ,लसूण खात नाही. उपवासामध्ये आपण साबुदाण्याची खिचडी , वरीचा भात , असे पदार्थ बनवत असतो . तर आज आम्ही तुम्हाला पनीर भुर्जी ते पण कांदा आणि लसूण न वापरता कशी बनवायची पनीर भुर्जी ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत .

हे ही वाचा : उपवासाठी चमचमीत आणि स्वादिष्ट वरीची खिचडी

 

नवरात्र स्पेशल पनीर भुर्जी रेसिपी –

 

नवरात्र स्पेशल पनीर भुर्जीला लागणारे साहित्य –

– पनीर २०० ग्रॅम

– जिरे १/४ टीस्पून

– हिरव्या मिरच्या ४-५ बारीक चिरून

– तेल १ टेस्पून

– हळद १\४ टीस्पून

– चवीनुसार रॉक मीठ

कृती –

सर्व प्रथम कढईत तेल घालून घ्या आणि मध्यम आचेवर तेल गरम करा.

तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाका आणि हलके थंड करून घ्या .

जिरे फोडणीनंतर त्यात मिरची घालून चांगले परतून घ्या . त्या मिश्रणामध्ये मॅश केलेले पनीर घालून घ्या आणि त्यावरून हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्या आणि चांगले परतून घ्या परतून झाल्यानंतर पनीर चांगले शिजवून घ्या . आणि गरमागरम पनीर खाण्यासाठी तयार आहे .

हे ही वाचा :

Navratri 2022 : नवरात्रीमध्ये उपवास करताना “या” गोष्टी ठेवा लक्षात

 

Latest Posts

Don't Miss