घरच्या घरी बनवा शेवयांची चविष्ठ खीर

घरच्या घरी बनवा शेवयांची चविष्ठ खीर

खीरीचे वेगवेगळे प्रकार असतात. साबुदाणा खीर , तांदळाची खीर , सफरचंदाची खीर असे प्रकार असतात. तसेच खीर खायला सर्वाना आवडते. शेवयांची खीर घरात काही खास क्षण असेल तर खीर बनवली जाते. शेवयांची खीर ही भारतीय लोकप्रिय डिश आहे. शेवयांची खीर लहानपणापासून ते अगदी मोठ्यांपरेंत लोकांना आवडते. शेवयांची खीर ही झटपट तयार होते.घरातल्या काही साहित्यापासून आपल्याला शेवयांची खीर बनवता येते. तर चला मग जाणून घेऊया शेवयांची खीर कशी बनवायची.

हे ही वाचा : घरच्या घरी फ्रेंच टोस्ट बनविण्याची रेसिपी

 

शेवयांची खीर बनवण्याची रेसिपी –

शेवयांची खीर बनवण्याचे साहित्य –

२०० मिलिलिटर दूध

१.४ कप कन्डेंस्ड मिल्क

आवश्यकतेनुसार हिरवी वेलची

५० ग्रॅम राइस व्हर्मीसेली

३ चमचे साखर

बदाम

काजू

तूप

 

शेवयांची खीर बनवण्याची कृती –

सर्व प्रथम एका पॅनमध्ये तूप घ्या. आणि त्या तूप मध्ये काजू , बदाम चांगले भाजून घ्या. मग त्यामध्ये मनुके चांगले भाजून घ्या. आणि भाजल्यानंतर हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर पॅनमध्ये शेवया भाजून घेणे. शेवया खाली लागू नये म्हणून सतत ढवळत राहा. त्यानंतर शेवया थंड होऊन द्या. मग चांगले दूध उकळून घ्या. दूध उखाळ्यानंतर त्यामध्ये शेवया टाका. आणि चांगले शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये काजू ,बदाम, मिल्कपावडर वेलची पूड घालून घ्या आणि चांगले ढवळून घ्या. आणि खाण्यासाठी शेवया खीर तयार आहे.

हे ही वाचा :

कोजागिरी पोर्णिमेसाठी स्पेशल मसाला दूध कसे बनवायचे, जाणून घ्या रेसिपी

 

Exit mobile version