spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अशा सोप्या पद्धतीने बनवा झटपट उपवासाचे थालीपीठ

साबुदाण्याच्या पाककृती सहसा धार्मिक उपवासाच्या दिवसांसाठी केल्या जातात.

साबुदाणा थालीपीठ हे कुरकुरीत आणि मऊ असतात. यालाच आपण मराठी मध्ये उपवासाचे थालीपीठ म्हणतो. साबुदाण्याच्या पाककृती सहसा धार्मिक उपवासाच्या दिवसांसाठी केल्या जातात. येथे आपण तेच थालीपीठ बनवायला शिकणार आहेत.

थालीपीठ साहित्य:

२ वाट्या भाजणी

२ उकडलेले बटाटे

१ वाटी भाजलेल्या दाण्याचे कूट

पाच-सहा हिरव्या मिरच्या किंवा एक ते दीड चमचा लाल तिखट

मीठ, अर्धा चमचा साखर

चतकोर लिंबू किंवा १ चमचा ताक (दोन्हीही नसल्यास चालते.)

बारीक चिरलेली कोथिंबीर

१ चमचा तूप किंवा रिफाईड तेल

कृती:

  • उकडलेला बटाटा किसणीवर किसावा अगर हाताने कुस्करावा. नंतर मिरच्या वाटून घ्याव्यात.
  • भाजणी, बटाटा, दाण्याचे कूट, वाटलेली मिरची, साधारण एक मोठा चमचा मीठ, साखर एकत्र करावे. लिंबू पिळावे.
  • थोडेसे म्हणजे लागेल तसे पाणी घालून पीठ मळावे. थापता येण्याइतपत गोळा सैल करावा. तवा किंवा कढईला तूप लावावे किंवा रिफाईंड तेल एक चमचा घालावे. त्यावर साधारण हातात मावेल एवढा गोळा घेऊन पातळ थापावे. झाकण ठेवून मध्यम गॅसवर भाजावे.
  • चुरचुर आवाज आला की झाकण काढून थालीपीठ उलटावे. तूप सोडून मंद आचेवर झाकण न ठेवता भाजावे.
  • साजूक तूप, लोणी किंवा दह्याबरोबर खावयास द्यावे. बटाटा उकडण्याऐवजी किसून घातला तरी चालतो.
  • फ्रायपॅन मध्ये थालीपीठ लावल्यास तेल किंवा तूप कमी लागते, तळाला चिकटण्याची भीती नाही. एवढ्या मिश्रणाची साधारण मध्यम आकाराची चार ते पाच उपवासाचे थालीपीठ होतात.

हे ही वाचा:

‘ … जे पेरलंय, ते उगवतंय’, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा खोचक टोला

राज ठाकरे चार दिवसीय दौऱ्यासाठी निघाले एक्सप्रेसने

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss