नाश्त्यासाठी बनवा कोबीची वडी, जाणून घ्या रेसिपी…

नाश्त्यासाठी बनवा कोबीची वडी, जाणून घ्या रेसिपी…

सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायची हा प्रश्न तुम्हाला नक्की पडतो. तसेच तुम्ही साबुदाणा खिचडी , पराठा , पोहे इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा असाल तर आज आम्ही तुम्हाला खास कोबी पासून वडी कसे बनवायचे ते सांगणार आहोत. तसेच कोबी खाणे आयोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोबी खाण्याचे आरोग्यासाठी चांगले फायदे आहेत. जर तुम्हाला कफ झाला असेल तर तुम्ही कोबीचे सेवन करू शकता. कोबी चे सेवन केल्याने कफ वितळण्यास मदत होते. कोबी मध्ये ‘अ’ जीवनस्तवे भरपूर प्रमाणात असते. आणि व्हिटॅमिन सी देखील जास्त प्रमाणात असते. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते. तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणा मध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही कोबीचे सेवन आवर्जून करा. जाणून घेऊया कोबीची वडी कशी बनवायची.

हे ही वाचा : घरच्या घरी बनवा शेवयांची चविष्ठ खीर

 

साहित्य –

बेसन

कीसलेले आले

कोथिंबीर

किसलेली कोबी

मीठ चवीनुसार

धणे पूड

जिरे पूड

ओवा

आमचूर पावडर

हिंग

हळद

लाल तिखट

 

कृती –

सर्व प्रथम एका भांड्यात खिसलेली कोबी घेणे. त्यामध्ये बेसन आणि कीसलेले आले , कोथिंबीर, मीठ चवीनुसार , धणे पूड, जिरे पूड,
ओवा, आमचूर पावडर, हिंग , हळद, लाल तिखट , घालून मिश्रण एकजीव करून घेणे.

त्यानंतर चांगले पीठ मळून घ्या.

पीठ मळून झाल्यानंतर त्याचे रोल तयार करा.

आणि हे रोल कुकरमध्ये २० मिनिटे शिजवून घ्या.

त्यानंतर हे रोल काढून घ्या आणि थंड करून घ्या आणि त्यापासून चांगले वड्या तयार करून घ्या आणि तेलात चांगले टाळून घ्या.

आणि तुम्ही हे वड्या चटणी , टोमॅटो सॉस सोबत देखील खाऊ शकता.

हे ही वाचा :

रात्रीच्या जेवणासाठी बनवा बटाटा टोमॅटोची खमंग ग्रेव्ही

 

Exit mobile version