spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Christmas party हे स्नॅक्स ख्रिसमस पार्टीसाठी तुम्ही बनवू शकता, जाणून घ्या पद्धत

संपूर्ण भारत भरात ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा महोत्सव धुळीस मिळाला होता, मात्र यावेळी तयारी जोरात सुरू आहे. लोकांमध्ये याबाबत प्रचंड उत्साह दिसून येत आहे. २५ डिसेंबरला आणखी खास बनवण्यासाठी ख्रिसमस पार्टी आयोजित करण्यात येत आहे. पार्टी म्हटले तर खाण्याच्या गोष्टी येतात पण अनेकांना प्रश्न पडतो कि पार्टी साठी कोणते पदार्थ करायचे? पण या बातमीमध्ये जाणून घ्या पार्टीसाठी कोणती झटपट रेसिपी बनवता येईल.

कॉर्न कटलेट बनवण्यासाठी साहित्य (Corn Cutlets)

उकडलेले कॉर्न – 1 कप

लाल तिखट – अर्धा टीस्पून

चाट मसाला – अर्धा टीस्पून

हिरवी धणे – २ चमचे चिरून

बारीक चिरलेले आले – १ टीस्पून

लिंबाचा रस – 1 टीस्पून

हेही वाचा : 

Bigg boss 16 ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खाननं शालीन भानोट आणि एमसी स्टॅनची घेतली शाळा, पहा काय म्हणाला भाईजान

चवीनुसार मीठ

बटाटा – 1 उकडलेले

तांदळाचे पीठ किंवा कॉर्न स्टार्च – 2 ते 3 चमचे

जिरे पावडर – 1 टीस्पून

तेल – आवश्यकतेनुसार

सर्व प्रथम कॉर्न वाफवून चांगले शिजवून घ्या. आता उकडलेल्या कॉर्नमध्ये चिरलेले आले, लाल मिरची, चाट मसाला, लिंबाचा रस, मीठ घालून मिक्स करा. यानंतर उकडलेले बटाटे सोलून मॅश करा. आता त्यात तांदळाचे पीठ, जिरेपूड, तिखट आणि मीठ मिक्स करा. यानंतर बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा घ्या आणि त्यातून एक गोळा तयार करा. आता या वर्तुळात कॉर्न स्टफिंग टाका आणि झाकून ठेवा. आता त्याला कटलेटचा आकार द्या. नंतर कढई गरम करून त्यात तेल घाला. यानंतर भरलेल्या कॉर्न कटलेट गरम तेलात टाकून तळून घ्या. जेव्हा कटलेट सोनेरी तळलेले असतात तेव्हा त्यांना किचन टॉवेलवर बाहेर काढा. आता गरमागरम कॉर्न कटलेट कोथिंबिरीच्या चटणीसोबत मुलांना सर्व्ह करा.

Watch Video, चक्क लग्नात नवऱ्यामुलीने दिरासोबत धरला ठेका

Latest Posts

Don't Miss