संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा Crispy Poha Nuggets

अनेकदा पोहे हा पदार्थ मुख्यतः नाश्त्याला बनवून खाल्ला जातो. तुम्हाला नॉर्मल पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पोह्यापासून अतिशय रुचकर आणि कुरकुरीत असा नवीन पदार्थ बनवू शकता.

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा Crispy Poha Nuggets

अनेकदा पोहे हा पदार्थ मुख्यतः नाश्त्याला बनवून खाल्ला जातो. तुम्हाला नॉर्मल पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही पोह्यापासून अतिशय रुचकर आणि कुरकुरीत असा नवीन पदार्थ बनवू शकता. हा पदार्थ संध्याकाळच्या स्नकसाठी तर उत्तमच. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडेल. तसेच हा पदार्थ तुम्ही कमी वेळेत बनवून तुमच्या प्रियजनांना खाऊ घालू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी अधिक जिन्नसांचीही आवश्यकता नसते. चला तर पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

पोहे – १ कप (Poha)
उकडलेले बटाटे – ४-५ (Boiled potatoes)
चीज चौकोनी तुकडे – १० (Cheese cubes)
हिरवी मिरची चिरलेली – १ टीस्पून (Chopped green chillies)
कोथिंबीर चिरलेली – २ टेस्पून (Chopped coriander)
लाल तिखट – १/४ टीस्पून (Red Chilli)
गरम मसाला – १/२ टीस्पून (Garam Masala)
काळी मिरी पावडर – १/४ टीस्पून (Black pepper powder)
आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून (Ginger-garlic paste)
तेल – तळण्यासाठी (Oil)
मीठ – चवीनुसार (Salt)

कृती:

पोहे नगेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे स्वच्छ करून नंतर दोन-तीन वेळा पाण्याने धुवून घ्या. आणि मग २-३ चमचे पाणी एका भांड्यात टाकून वितळण्यासाठी ठेवावे. आता बटाटे कुकरमध्ये उकळून घ्या आणि नंतर उकळल्यानंतर त्यांची साले काढून एका भांड्यात बटाटे मॅश करा. भांड्यात आले-लसूण पेस्ट, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लाल तिखट, काळी मिरी पावडर आणि इतर सर्व मसाले टाका. आता बटाट्यात सर्व गोष्टी नीट मिसळा आणि शेवटी चवीनुसार मीठ घालून सर्वकाही नीट एकजीव करून घ्या. आता थोडे तयार मिश्रण हातात घेऊन त्याचे गोळे बनवा आणि मधोमध चीजचा तुकडा ठेवून त्याला चौकोनी आकार द्या. त्याचप्रमाणे सर्व गोळे तयार करून प्लेटमध्ये ठेवा.

आता कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात तयार पोहे नगेट्स घालून कुरकुरीत होईपर्यंत नीट तळून घ्या. नगेट्स दोन्ही बाजूंनी कुरकुरीत आणि सोनेरी झाले की एका प्लेटमध्ये पोहे नगेट्स टाळून ठेवा. त्याचप्रमाणे सर्व पोहे नगेट्स तळून घ्या. चविष्ट पोहा नगेट्स नाश्त्यासाठी तयार आहेत. हे पोहे नगेट्स गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा.

हे ही वाचा:

प्रसिद्ध अभिनेत्याचे Facebook Page hack, पोस्ट करत दिली माहिती म्हणाला …

Shravan Special, उपवासाला बनवा भगरीचा खास पुलाव

Welcome 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version