नवरात्रीच्या उपवासात बनवा कुरकुरीत बटाट्याची शेव

नवरात्री उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सगळीकडे देवीच्या आगमनाची तयारी चालू आहे. या उत्सवात नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा केली जाते.

नवरात्रीच्या उपवासात बनवा कुरकुरीत बटाट्याची शेव

नवरात्री उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सगळीकडे देवीच्या आगमनाची तयारी चालू आहे. या उत्सवात नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा केली जाते. देवीच्या आगमनानंतर तिची विधीवत पूजा करून देवीला नैवेद्य दाखवला जातो. या नऊ दिवसाच्या कालावधीत उपवास केला जातो. या नऊ दिवसाच्या उपवासात अनेक नवनवीन पदार्थ बनवले जातात. पण तुम्ही जर नेहमीचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा असला तर एक उपवासाची सोपी रेसिपी आपण पाहणार आहोत. बटाट्याचे शेव कसे करायचे, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य:-

बटाटे (दोन ते तीन)
हिरव्या मिरच्याची बारीक पेस्ट ( १ चमचा)
जिरेपूड ( १ चमचा)
राजगिऱ्याचे पीठ (३ चमचे)
तेल

कृती:-

सर्वप्रथम बटाट्याचे शेव बनवण्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कुकर मध्ये एक ग्लास पाणी टाकून त्यात बटाटे टाकून घ्या. कुकरचे झाकण बंद करून झाल्यानंतर ते गॅस वर ठेवा. गॅस चालून केल्यानंतर त्या कुकरच्या ४ शिट्या काढून घ्या. चार शिट्या काढून झाल्यानंतर बटाटे थंड करून घ्या. थंड करून झाल्यानंतर पुरणयंत्रातून बटाटे बारीक वाटून घ्या. त्यात हिरव्या मिरच्याची पेस्ट, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ टाकून ते चांगलं मिक्स करून घ्या. संपूर्ण बटाट्याचे पीठ नीट मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर शेवपात्रातून शेव पाडा. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकून ते गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर शेव टाळून घ्या. शेव तळून झाल्यानंतर तयार आहे बटाट्याची शेव.

हे ही वाचा: 

केसांसाठी ही ट्रीटमेंट ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या सविस्तर माहिती

राज ठाकरेंच्या आक्रमक भूमिकेनंतर मनसैनिकानीं पहिला मुलुंड टोलनाका पेटवला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version