घरच्या घरी बनवा चविष्ट ब्रेड मिसळ

घरच्या घरी बनवा चविष्ट ब्रेड मिसळ

मिसळ हा पदार्थ सर्वांचा आवडता पदार्थ आहे. मिसळ म्हटले की जिभेला पाणी हे सुटतेच. मिसळमध्ये शेव, चिवडा हमखास असल्याने यासाठी फारशी तयारी करावी लागत नाही. तसेच मिसळीसोबत सलाड आणि ताक असेल तरी जेवणासाठी हा उत्तम मेन्यू होऊ शकतो.

हे ही वाचा : घरच्या घरी बनवा मसाला खिचडी

 

मिसळ हा असा पदार्थ आहे की तो कोणत्यापण ऋतूमध्ये बनवता येतो. मिसळ ही चमचमीत आणि सगळ्यांच्या आवडीचा आणि पोटभरीचा असा प्रकार आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व जण आपल्याला पद्धतीने मिसळ बनवत असतात. तसेच मिसळ मध्ये भरपूर प्रकार असतात. जसे की कोल्हापूरी मिसळ, पुणेरी मिसळ , नागपुरी मिसळ असे मिसळीचे प्रकार असतात. जर तुम्हाला रोजचे जेवण करून कंटाळा आला असेल तर तुम्ही मिसळ बनवून खाऊ शकता. तसेच मिसळ हा असा पदार्थ आहे की तो झटपट तयार होतो. चला तर मग जाणून घेऊया रेसिपी.

साहित्य –

१ वाटी मटकी
१ बटाटा
तेल
कांदा
टोमॅटो
गरम मसाला
फरसाण
पोहे कुरमुऱ्याचा चिवडा
कोथिंबीर
लिंबू
ब्रेड
लसूण
लवंग
दालचिनी
तमालपत्र
जिरेपूड
धणेपूड
मीठ
आमसूल

कृती –

सर्व प्रथम मटकी कुकरमध्ये शिजवून घ्यावी. त्यानंतर लसूण , लवंग दालचिनी तमालपत्र बारीक करून घेणे. मग कढई घेणे आणि त्यात थोडे तेल घालून चांगले तेल गरम करून घ्यावे. तयार केले लवंग , दालचिनीचे मिश्रण घालावे आणि चांगले परतवून घेणे. परतवून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून चांगले फ्राय करून घेणे. आणि मिश्रण बाउल मध्ये काढून थंड करून घ्यावे. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून तेल गरम करून घेणे त्यामध्ये हिंग, हळद , मोहरी आणि मटकी घालून चांगले परतवून घेणे. त्यानंतर थोडे पाणी घालावे आणि गरम मसाला घालून मिक्सकरून घ्यावे. आणि बटाटे दुसऱ्या बाजूला फ्राय करून घेणे आणि मिसळ मध्ये घालून घेणे. चवी पुरते मीठ घालावे आणि चांगली मिसळ शिजवून घ्यावी. मिसळ शिजवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यावी आणि वरून फरसाण कांदा टोमॅटो घालून सर्व्ह करून घ्यावी.

हे ही वाचा :

रात्रीच्या जेवणाला तोंडी लावण्यासाठी बनवा लसूण चटणी

 

Exit mobile version