छोल्यांपासून बनवा चविष्ट मसाले पकोडे

छोल्यांपासून बनवा चविष्ट मसाले पकोडे

भारतीय जेवणात छोले खूप प्रसिद्ध आहेत. कोणताही कार्यक्रम असो, छोल्यांचे एक-दोन पदार्थ नेहमीच होत असतात. छोले हे जेवढे खायला चविष्ट आहे, तेवढेच ते पौष्टिकही आहे. छोल्यांमध्ये भरपूर गुणधर्म आहेत. तसेच छोले पंजाबी लोकांमध्ये भरपूर प्रसिद्द आहे. छोल्यानपासून भरपूर प्रकारचे पदार्थ बनवता येतात. छोल्यांचा उपयोग सुरकुत्या कमी करण्यासाठी , चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आणि केस मजबूती करण्यासाठी केला जातो. तसेच छोले आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. छोले खालल्याने भूक नियंत्रणात राहते. चांगल्या झोपेसाठी छोले उपयुक्त पदार्थ आहेत. छोल्यांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि महिल्यांच्या आरोग्यासाठी छोले उत्तम असतात. छोल्यांमुळे मधुमेह आजार नियंत्रणात राहतो. तसेच छोल्यांपासून छोले भटुरे देखील बनवले जातात तर आज आम्ही तुम्हाला छोल्यांपासून मसाले पकोडे कसे बनवायचे दाखवणार आहोत.

हे ही वाचा : उपवासाठी चविष्ट खमंग ढोकळा खास तुमच्यासाठी

 

रेसिपी –

 

छोले पकोडेचे साहित्य –

१ वाटी उकडलेले चणे

– १/२ टीस्पून काळी मिरी

– कढीपत्ता

– आमचूर पावडर

– १/२ टीस्पून गरम मसाला

– १/२ टीस्पून हळद

– ४ मोठे चमचे तेल

– मीठ चवीनुसार

छोले बनवण्याची कृती –

सर्व प्रथम उकडलेले छोले एका भांड्यात घ्या आणि त्यात मीठ, हळद, गरम मसाला, काळी मिरी पावडर घाला, आमचूर पावडर. सर्व मिश्रण मिक्स करून घ्या. मिश्रण एकत्र झाल्यावर पीठ मळून घ्या. आणि त्या पीठाचे छोटे गोळे तयार करा . त्यांना टिक्कीचा आकार देण्यासाठी किंचित सपाट करा. कढईत थोडं तेल टाका आणि टिकी तेलात सोडून द्या आणि हलका लाल रंग येईपर्यंत तळून घ्या आणि गरमागरम छोले मसाले पकोडे तयार आहेत.

हे ही वाचा :

आरोग्यासाठी गाजर खाण्याचे फायदे

 

Exit mobile version