spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कडू कारल्यापासून बनवा स्वादिष्ट सीख कबाब; जाणून घ्या रेसिपी

कारल्याची भाजी सर्वांना आवडत नाही. कारल्याची भाजी म्हटल्यावर आपण नाक मुरडतो. तसेच कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे . कारल्यापासून आपण भाजी, लोणचे अनेक पदार्थ बनवू शकतो. कारल्याची भाजी खाल्याने आपल्याला पित्ताचा त्रास होणार नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारले खूप फायदेशीर आहे. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन असते ते त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. कारल्याचा रस घेतल्यास पोषक तत्वे शरीराला मिळतात. कारल्याचा रस यकृत स्वच्छ करतो. रोगप्रतिकार शक्ती कमी असेल तर कोणतेही आजारपण सहज होण्याचा धोका असतो. यासाठी प्रत्येकाने प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते. ज्यामुळे आजारपण आपल्यापासून दूर राहते आणि आपल्याला कोणताही त्रास होत नाही.

हे ही वाचा : हिवाळ्यात रताळी खाणे ठरते शरीरासाठी फायदेशीर

 

कारल्यापासून सीख कबाब बनविण्याची रेसिपी –

 

कारल्यापासून सीख कबाब बनविण्याचे साहित्य –

कारले २-३

पालक २०० ग्रॅम

बटाटे खिसलेले ३-४

मावा १ कप

बेसन १ कप

जिरे

लसूण किसलेले २-३

बदाम १०

मका १०० ग्रॅम

तूप २ चमचे

काळी मिरी ग्राउंड १ टीस्पून

फरसबी २०० ग्रॅम

मीठ चवीनुसार

तेल

कृती –

सर्व प्रथम कढईत तूप घालून मंद आचेवर गरम करून घ्या. तूप वितळल्यावर त्यामध्ये जिरे घाला. जिरे तडतडल्यास त्यामध्ये लसूण , आले परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये बटाटे , कारले , काळीमिरी पावडर आणि मीठ घालून हे मिश्रण चांगले परतवून घ्या आणि यामध्ये बदाम , मका घाला. दुसऱ्या बाजूला पॅन मध्ये बेसनाचे पीठ भाजून घ्या आणि कारल्याच्या मिश्रणात मिक्सकरून घ्या. त्यामध्ये गरजे प्रमाणे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर गोल आकारात थापून घ्या आणि पॅन मध्ये तेल घालून त्यात हलके डीप फ्राय करून घ्या. सेजवानी चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता.

हे ही वाचा :

लहानमुलांसाठी स्पेशल चहा सोबत बटाटे चिप्स

 

Latest Posts

Don't Miss