spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घरच्या घरी बनवा कोहळ्यापासून चविष्ट शिरा; जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

प्रत्येकाच्या घरी आठवड्यातून एकदा तरी शिरा बनतोच. शिऱ्याचं नाव काढलं कि आपल्याला रव्याचा शिरा आठवतो. अगदी सणावारापासून ते काहीवेळेस नाश्त्यासाठी आपण शिरा बनवतो. बहुतांश जणांना प्रसादातील शिरा प्रचंड आवडतो. साजूक तूप घालून काही वेळेस केळी घालून तर कधी दुधातला शिरा तर आपण नेहमीच बनवतो.

प्रत्येकाच्या घरी आठवड्यातून एकदा तरी शिरा बनतोच. शिऱ्याचं नाव काढलं कि आपल्याला रव्याचा शिरा आठवतो. अगदी सणावारापासून ते काहीवेळेस नाश्त्यासाठी आपण शिरा बनवतो. बहुतांश जणांना प्रसादातील शिरा प्रचंड आवडतो. साजूक तूप घालून काही वेळेस केळी घालून तर कधी दुधातला शिरा तर आपण नेहमीच बनवतो. पण तुम्ही कधी कोहळ्याचा शिरा खाल्ला आहात का? कोहळ्याचे आपल्या निरोगी आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कोहळा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असून यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्मे आहेत. मिठाईसारखाय अनेक पदार्थांमध्ये कोहळ्याचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये कोहळ्याला भरपूर महत्व आहे. कोहळ्याचे अनेक फायदे असून हा पदार्थ अतिशय गुणकारी आहे. कोहळा हा शीत असून त्याचे सेवन केल्याने आपली बुद्धी तल्लख होते. त्याचबरोबर कोहळ्याचा उपयोग पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी देखील केला जातो. कोहळ्याचे सेवन केल्याने दररोज पोट साफ होऊन आपल्याला पोटाच्या निगडित कोणत्याच समस्यांना सामोरे जावे लागत नाही. तुम्हाला जर मुळव्याधाचा त्रास असेल तर तुम्ही कोहळ्याचे सेवन नक्कीच केले पाहिजे. कोहळ्याचे अनेक फायदे असून तुम्ही अगदी घरच्या घरी झटपट याचा शिरा बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या कोहळ्याच्या शिऱ्याची रेसिपी.

कोहळ्याचा शिरा बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

अर्धा कोहळा
तूप १/४ कप
साखर १ कप
किशमिश १ चमचा
मूठभर काजू
वेलचीपूड
दूध
केशर १ चमचा

कोहळ्याचा शिरा बनविण्यासाठीची कृती:

कोहळ्याचा शिरा बनविण्यासाठी सर्वात आधी तुमच्याकडे असलेले लहान आकाराचे भांडे घ्या. त्यामध्ये दूध घालून त्यात केशर घाला आणि व्यवस्थित भिजू द्या. दुधात केशर घातल्याने शिऱ्याची चव अधिक वाढते. त्यांनतर कोहळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्याची साल काढून ठेवा. साल काढून झाल्यावर त्याचे लहान लहान तुकडे करा आणि त्यांना किसून घ्या. दुसरीकडे आता तुमच्याकडे असलेली कढई घ्या आणि गॅस पेटवून गॅस वर ठेवावी. त्यामध्ये किसून ठेवलेला कोहळा घाला. पेठेतील पाणी अगदी व्यवस्थित कोरडे होईपर्यंत गॅस मध्यम आचेवर ठेवून शिजवून घ्या. पाणी कोरडे होण्यास साधारण ४ ते ५ मिनिटे लागतात. त्या कढईत साखर घालून व्यवस्थित साखर मिक्स होईपारपर्यंत ढवळून घ्या. साखर चांगली मिसळल्यावर त्यामध्ये बनवलेले दूध आणि केशर यांचे मिश्रण घाला आणि व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यावर थोडा वेळ शिजवून गॅस बंद करा. अशाप्रकारे तुमचा कोहळ्याचा शिरा तयार होईल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यात ड्रायफ्रूट्स (Dry fruits) घालू शकता.

हे ही वाचा:

गिरणी कामगारांना घरे मिळू नये यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी, वर्षभर हप्ते सुरू चाव्या मात्र म्हाडाकडेच

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss