spot_img
Wednesday, September 11, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ढाबा स्टाईल डाळ तडका बनवा घरच्या घरी

Dal tadka : कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडी म्हटल्यावर गरमागरम पदार्थ खायाला सर्वनाच आवडते. तर आज आम्ही तुम्हाला ढाबा स्टाईल डाळ तडका रेसिपी या बद्दल सांगणार आहोत. तसेच डाळ तडका मूग डाळी पासून बनवला जातो. तसेच मुगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्याच बरोबर मूग डाळीमध्ये पॉटेशियम, व्हिटॅमिन्स, झिंक, कॉपर असे पोषक तत्वे असतात. मुगाच्या डाळीपासून तुम्ही सूप देखील बनवू शकता. सूप देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोकांना डाळ तडका ही रेसिपी आवडते. पण अनेक लोकांना ढाबा स्टाईल डाळ तडका बनवताना अनेक अडचणी येतात. म्हणून आता ढाबा स्टाईल डाळ तडका तुम्ही घरी देखील बनवू शकता.

साहित्य :

१/२ कप मूग डाळ

१/२ कप उडीद डाळ

लाल मिरची

चिमूटभर हिंग

१/२ टीस्पून जिरे

१ कांदा

१ टोमॅटो बारीक चिरून

१ हिरवी मिरची

१ टीस्पून लाल तिखट

१/४ टीस्पून हळद

२ टीस्पून धने पावडर

१/२ टीस्पून गरम मसाला

२ टीस्पून आलं लसूण पेस्ट

१/२ टीस्पून कस्तुरी मेथी

२ चमचे तेल

१ टीस्पून हिरवी धणे

गरजेनुसार पाणी

चवीनुसार मीठ

 

कृती :

सर्वप्रथम मूग डाळ आणि उडीद डाळ कुकरमध्ये घालून घेणे, आणि त्याला २ शिट्या देणे. डाळ चांगली शिजवून घेणे.

त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घालून घेणे, आणि चांगले गरम करून घेणे.

त्यामध्ये हिंग, जिरे लाल मिरची घालून घेणे आणि चांगले परतवून घेणे. मिश्रण परतवून झाले की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची घालून घेणे आणि चांगले परतवून घेणे. मग कांदा घालून घेणे आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेणे.

मिश्रण परतवून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, धणे, मिरची पावडर, गरम मसाला घालून घेणे आणि चांगले परतवून घेणे. मिश्रण परतवून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घेणे. २ मिनिटे शिजवून घेणे. नंतर डाळ घालून घ्या आणि वरून कस्तुरी मेथी घालून घ्या आणि परत एकदा शिजवून घेणे. अशा प्रकारे ढाबा स्टाइल डाळ तडका खाण्यासाठी तयार आहे. डाळी वर तूप कोथिंबीर घालून घेणे आणि ही डाळ तुम्ही भात चपाती सोबत देखील खाऊ शकता.

हे ही वाचा :

तुम्हाला घनदाट केस आवडतात ? तर या टिप्स तुमच्यासाठी…

 

Latest Posts

Don't Miss