फक्त एका बटाट्यापासून आणि १ कप साबुदाण्यापासून बनवा Farali Potato Nugget…

साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याची खीर तर आपण नेहमी खातो पण साबुदाण्यापासून आणि एका बटाट्यापासून बनवलेले नगेट्स तुम्ही खाल्ले आहेत का?

फक्त एका बटाट्यापासून आणि १ कप साबुदाण्यापासून बनवा Farali Potato Nugget…

बटाटा हा प्रत्येकालाच खायला आवडतो. साबुदाणे बनवताना त्यात बटाटे टाकून खाणे म्हणजे एका प्रकारचे स्वर्ग सुखच असते. बटाटे आणि साबुदाने प्रत्येकजण आवडीने खातो. उपवास म्हंटलं कि साबुदाणे आलेच. साबुदाणा खाण्याचा एक मोठा खवय्यावर्ग आहे. काहींना साबुदाण्याची खिचडी आवडते, तर काहींना नाही. साबुदाणा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. साबुदाणा हा फायबर, फॉस्फरस, पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे. साबुदाण्याचे अनेक प्रकार केले जातात.

साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे पापड, साबुदाण्याची खीर तर आपण नेहमी खातो पण साबुदाण्यापासून आणि एका बटाट्यापासून बनवलेले नगेट्स तुम्ही खाल्ले आहेत का? साबुदाण्या पासून बनवलेले हे नगेट्स चवीला अगदी कमल असतात. तसेच लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडतात चला तर मग जाणून घेऊयात साबुदाणा नगेट्स ची कमाल रेसिपी.

साबुदाणा नगेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

साबुदाणा
बटाटा
हिरवी मिरची
मीठ
पाणी
तेल

साबुदाणा नगेट्स तयार करण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्वप्रथम, एक वाटी साबुदाणा मिक्सरमधून वाटून घ्यावे. तसेच त्याची बारीक पावडर करून घावी. साबुदाण्याची बारीक पावडर करून झाल्यानंतर त्यात एक चिरलेला बटाटा, आवडीप्रमाणे मिरच्या, चवीनुसार मीठ, एक कप पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी. ही तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्यावी . त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवावे.दुसरीकडे कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल गरम झाल्यानंतर त्यात नगेट्स तळून घ्यावे. सोनेरी रंग आल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून ठेवा. अशा प्रकारे साबुदाणा नगेट्स खाण्यासाठी रेडी आहेत.

हे ही वाचा:

Makhana Bhel भेळ बनवा घरच्या घरी, सोप्पी रेसिपी फक्त तुमच्यासाठी!

राज्यामधील गद्दार सरकारची लवकरच अनिव्हर्सरी, सुप्रिया सुळेंची खोचक टीका

प्रभुदेवा बनला वयाच्या ५०व्या वर्षी बाबा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version