spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रात्रीच्या जेवणाला तोंडी लावण्यासाठी बनवा लसूण चटणी

लसणाचे आरोग्याला खूप फायदे आहेत. कधी कधी तोंडाला चव नसते. आणि कोणता पदार्थ बनवायचा हा प्रश्न नक्की तुम्हाला पडत असेल. तसेच बरेच लोक रोज रोज तेच जेवण जेवायला कंटाळा येतो. आणि आपण कधी कधी जेवत देखील नाही. तर तुम्ही तोंडी लावण्यासाठी लसणाची चटणी देखील बनवू शकता. ती खाण्यासाठी खूप चविष्ट असते. तर आज आम्ही तुम्हाला लसणाची चटणी कशी बनवायची ते सांगणार आहोत.

हे ही वाचा: घरच्या घरी बनवा मसाला खिचडी

 

लसणाचे आरोग्याला खूप फायदे असतात. लसूण हा शरीरामध्ये रक्तांच्या गाठी न होऊ देता रक्त पातळ करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच तुमचे डोकेदुखी वगरे होत असेल तर तुम्ही लसूण डोक्याला चोळू शकता. त्यामुळे तुमचे डोके दुखी थांबते. तुम्ही लसणापासून लोणचे देखील बनवू शकता. तसे लसूण हा आपण रोजच्या जेवणात देखील वापरू शकता.

साहित्य –

६ ते ७ अख्खे लसूण

२० ते ३० ग्रॅम सुक्या लाल मिरच्या.

बडिशेप, जिरे आणि मोहरी प्रत्येकी एकेक टेबलस्पून

१ ते दिड टेबलस्पून तेल

२ टेबलस्पून लिंबाचा रस

चवीनुसार मीठ

 

कृती –

सर्व प्रथम गॅसवर जाळी ठेवा आणि लसुन चांगला भाजून घ्या. लसणावर काळपट रंग आला की समजा लसूण चांगला भाजला गेला आहे. त्यानंतर लसूण थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर एका भांड्यात जिरे, मोहरी आणि बडिशेप घालून चांगले भाजून घेणे. हे पदार्थ भाजून झाले की त्यात लाल मिरच्या घालून घ्या आणि चांगले भाजून घ्या. मिश्रण थंड झाले की ते मिक्सर मध्ये घालून घ्या. भाजलेल्या लसूणाच्या पाकळ्या देखील सोलून घाला. आणि त्यात थोडे मीठ घालून बारीक वाटून घ्या. चटणीत लिंबाचा रस घाला आणि सगळे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून काचेच्या बरणीत भरून ठेवा.

हे ही वाचा: 

घरच्या पद्धतीने बनवा रव्याच्या शंकरपाळ्या

 

Latest Posts

Don't Miss