घरच्या घरी बनवा चमचमीत आणि ओली भेळ

घरच्या घरी बनवा चमचमीत आणि ओली भेळ

भेळची अगदी लहान पासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते. भेळ बनवण्याचे खूप वेगवेगळ्या पद्धती आहे. काहीजणांना दुकानात मिळते तशी भेळ खायला भरपूर आवडते . आपण तशीच भेळ घरच्या घरी देखील बनवू शकतो. भेळ मध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत. कोल्हापुरी भेळ मसाला भेळ सुकी भेळ असे वेगवेगळे प्रकार आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात.

हे ही वाचा : सणाचा गोडावा वाढवण्यासाठी बनवा घरच्या घरी मावा कचोरी

 

भेळ बनवण्याची रेसिपी –

भेळ बनवण्याचे साहित्य –

२ कप ५० ग्राम कुरमुरे

१ मोठा कांदा बारीक चिरलेला

१ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला

१ मध्यम आकाराचा बटाटा उकडून बारीक
चौकोनी तुकडे करून घ्या.

हिरवी कोथिंबीर पुदिन्याची चटणी

लसणाची लाल चटणी

चिंच खजुराची गोड चटणी

चपट्या शेवपुरीच्या पापड्या आणि पाणीपुरीच्या पुऱ्या

अर्धा कप तिखट गाठी

अर्धा कप भावनगरी गाठी

अर्धा कप बारीक नायलॉन शेव

पाव कप मसाला शेंगदाणे

पाव कप बारीक चिरलेली कोथींबीर

१ टीस्पून चाट मसाला

पाव टीस्पून काळे मीठ

१ टेबलस्पून लिंबाचा रस

 

भेळ बनवण्याची कृती –

कुरमुरे व्यवस्थित साफ करून मग एका मोठ्या कढईत मंद आचेवर भाजून घेणे . ४-५ मिनिटे कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत.

एका मोठ्या भांड्यात कुरमुरे , चिरलेला कांदा , टोमॅटो , बटाटा आणि लिंबाचा रस घालून एकत्र करावे. मसाला शेंगदाणे , व इतर फरसाण सुद्धा घालावे. चाट मसाला , काळे मीठ आणि पापडी व पुऱ्या चुरून घालाव्यात .

हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणे.

तुमच्यासाठी चटपटीत भेळ तयार आहे.

हे ही वाचा :

आज तुमच्यासाठी स्पेशल मखान्याचा हलवा

 

Exit mobile version