घरच्या घरी १० मिनिटांत बनवा बेसन हलवा

आपल्याला अनेकदा घरी असल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते.

घरच्या घरी १० मिनिटांत बनवा बेसन हलवा

आपल्याला अनेकदा घरी असल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यावेळी आपण लगेच शिरा किंवा खीर बनवून खातो. पण जर तुम्हाला तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही बेसनाचा हलवा घरी बनवू शकता. घरच्या सामनामध्ये बेसन सहज उपलब्ध असते. आपण अनेकदा गाजराचा हलवा, मुगाच्या डाळीचा हलवा घरी बनवून खातो पण तुम्ही कधी बेसनाचा हलवा घरी बनवला आहे का? नसले बनवला तर आम्ही तुम्हाला झटपट रेसिपी सांगणार आहोत. चला तर पाहुयात बेसनाच्या हलव्याची रेसिपी..

साहित्य:-

१ वाटी बेसन पीठ
गरजेनुसार पाणी
२ चमचे रवा
१ वाटी साखर
२ चमचे दूध
सुकामेवा (आवडीनुसार)
केसर (आवडीनुसार)

कृती:-

सर्वप्रथम बेसनाचा हलवा बनवण्यासाठी एका भांड्यात आवश्यकतेनुसार पाणी घेऊन त्यात वेलची पावडर आणि केशर घालून उकळण्यास ठेवा. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवल्यानंतर त्यात २ ते ३ चमचे तूप घालून ते गरम करून घ्या. तूप गरम झाल्यानंतर बेसन आणि रवा मंद आचेवर गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर त्याला चागंला तुपाचा वास येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर त्यात साखर घालून घ्या. साखर वितळल्यानंतर गरम केलेले पाणी पीठामध्ये ओतून घ्या. त्यानंतर ते नीट मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर हलवा दाणेदार होण्यास सुरुवात होईल. नंतर त्यात केसर घातलेले २ चमचे दूध टाकून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तूप टाकून ड्रायफ्रूट भाजून घ्या. भाजून घेतलेले ड्रायफ्रूट हलव्यामध्ये टाकून मिक्स करून घ्या. तयार आहे बेसन हलवा.

हे ही वाचा:

मनोज जरांगे पाटील यांच्यावर ‘या’ महिलेने केले गंभीर आरोप, म्हणाली…

तुम्हाला तुमचा चेहरा नेहमी ग्लोईंग हवा असेल तर ‘या’ पद्धती फॉलो करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version