घरच्या घरी बनवा Healthy and Tasty नाचणीचे बिस्कीट

नाचणीचा वापर आपण रोजच्या आहारात फार कमी प्रमाणात करतो. परंतु नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात.

घरच्या घरी बनवा Healthy and Tasty नाचणीचे बिस्कीट

नाचणीचा वापर आपण रोजच्या आहारात फार कमी प्रमाणात करतो. परंतु नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ३-४ दिवसातून एकदा तरी नाचणी युक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. वास्तविक नाचणीमध्ये असणारे कॅल्शियमचे प्रमाण हाडांना अधिक मजबूती देते. नाचणीमध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर त्वरीत भूक लागत नाही , त्यामुळेच याने वजन वाढण्याचाही धोका नसतो. मुख्यतः बिस्किटे मैद्यापासून बनवले जातात, मैदा शरीरासाठी घातक ठरत असतो. याचे अधिक सेवन अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. त्यामुळेच मैद्याचे कधीही अधिक सेवन करू नये. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी नाचणीचे बिस्किटे कसे बनवायचे यासाठीची रेसिपी घेऊन आलो आहोत. हे बिस्किटे खाऊन तुमचे पोटही भरेल आणि आरोग्यही चांगले राहील.

साहित्य :

४ वाटी नाचणी पीठ (ragi flour)
२ वाटी पिठी साखर (powdered sugar)
२ वाटी तूप (ghee)
१ छोटा चमचा बेकिंग पावडर (baking powder)
मीठ चवीनुसार (Salt)

कृती:

नाचणीची बिस्किटे बनवण्यासाठी सर्वप्रथम नाचणीचे पीठ आणि बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या. त्यामध्ये तूप टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये पिठी साखर टाका आणि थोडे दूध टाकून घट्ट असा गोळा बनवून घ्या. आता तो गोळा ३० मिनिटे तसाच झाकून ठेवा. त्यानंतर तयार पिठाचा गोळा करून तो जाडसर लाटून घ्या. मग वाटीच्या साहय्याने त्याचे काप पाडा. यानंतर ओव्हन प्री हिट करून घ्या. आता ओव्हन प्री हिट झाला की, ओव्हनमध्ये १८० डि.सें. वर २० मिनिटे बिस्किटे बेक करा.

Exit mobile version