spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सकाळच्या नाश्त्यात बनवा मूगापासून ‘हा’ Healthy पदार्थ, मिळेल दिवसभरासाठी एनर्जी

रोज तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अशावेळी काहीतरी चटपटीत पण हेल्दी खावेसे वाटते. तेव्हा मूगापासून बनवलेला हेल्दी ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. स्प्राऊट्स ढोकळा ही एक पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे.

असं म्हणतात की सकाळचा नाश्ता पोटभर केल्याने आपल्याला दिवसभरासाठी एनर्जी मिळते. यासाठी सकाळच्या नाश्त्यात हेल्दी खाणे महत्त्वाचे असते. त्याचबरोबर आजकाल सगळेच आपल्या हेल्थकडे विशेष लक्ष देताना दिसत आहेत. सकाळच्या हेल्दी नाश्त्यात आपण ओट्स, दलिया फ्रुट सलाड असे अनेक हेल्दी पदार्थ खातो. परंतु रोज तेच-तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अशावेळी काहीतरी चटपटीत पण हेल्दी खावेसे वाटते. तेव्हा मूगापासून बनवलेला हेल्दी ढोकळा हा उत्तम पर्याय आहे. स्प्राऊट्स ढोकळा ही एक पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे. ही रेसिपी खासकरून अंकुरलेल्या धान्यांसह तयार केली जाते. ही पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी कशी बनवायची हे आपण थोडक्यात पाहूया.

साहित्य:

  • मोड आलेले मूग – २ कप
  • रवा – १ कप
  • दही – १ कप
  • लिंबाचा रस – १ चमचा
  • आल्याची पेस्ट- १ चमचा
  • हिरव्या मिरच्या – २-३ बारीक चिरलेल्या
  • हळद – १/४ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • खायचा सोडा किंवा फ्रुट इनो – १/४ चमचा
  • तेल – १ चमचा
  • मोहरी – १/२ चमचा
  • कडीपत्ता – ८-१० पानं
  • सफेद तीळ – १/२ चमचा
  • साखर – १ चमचा (ऐच्छिक)
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
  • ताजं खोबरं – सजावटीसाठी

कृती:

  • हिरवे मूग धान्य चांगले धुवून ते रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाणी काढून टाका आणि धान्ये ओलसर कापडात बांधून ठेवा. १२-२४ तासांमध्ये अंकुर येतील.
  • एका बाऊलमध्ये रवा, दही आणि थोडं पाणी घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण १५-२० मिनिटं बाजूला ठेवा जेणेकरून रवा चांगला भिजेल.
  • भिजवलेल्या रव्यात मोड आलेले मूग, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, हळद, लिंबाचा रस, साखर (ऐच्छिक) आणि मीठ घाला. हे सर्व चांगले मिसळा. मिश्रण जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालू शकता.
  • आता मिश्रणात खायचा सोडा घाला आणि लगेच चांगलं हलवून घ्या.
  • एक ८ इंची ताटली (थाळी) घ्या आणि त्याला तेल लावा. तयार मिश्रण ताटलीत ओता आणि वाफवण्यासाठी १५-२० मिनिटं ठेवा. ढोकळा तयार झाला की त्याला सुरीने चिरून पाहा, जर सुरीला मिश्रण लागलं नाही, तर ढोकळा तयार आहे.
  • एका छोट्या कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर त्यात कडीपत्ता आणि तीळ घाला आणि ही फोडणी तयार ढोकळ्यावर ओता.
  • ढोकळ्याचे तुकडे करा आणि त्यावर कोथिंबीर आणि ताजं खोबरं भुरभुरा. तुमचा स्वादिष्ट स्प्राऊट्स ढोकळा तयार आहे.
  • हा ढोकळा चटणी किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करा.
हे ही वाचा:

Dahihandi 2024 : दहीहंडी सणाला लागलं गालबोट!, मुंबईत थरावरुन कोसळून तब्बल १५ गोविंदा जखमी…

जखमी गोविंदांच्या वैद्यकीय तात्काळ मदतीसाठी साधा ‘या’ हेल्पलाईनवर संपर्क

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss