Tuesday, October 1, 2024

Latest Posts

जेवताना तोंडी लावण्यासाठी घरच्या घरी बनवा लसणाचे लोणचे

रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला येतो. येवढेच नाही तर आपल्याला रात्री जेवणासोबत तोंडी लावायला काय ना काय पाहिजे असते. आपण जेवणासोबत लोणचे चाखतो पण, तेच तेच लोणचे खाऊन कंटाळा येतो. तर आज आम्ही तुम्हाला लसूण पासून कसे लोणचे बनवायचे ते सांगणार आहोत. लसूण हा आपल्या आहारातील एक अतिशय उपयुक्त घटक. लसणामुळे आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होतात. तसेच आपण रोजच्या जेवणामध्ये लसूण वापरतोच. लसणामुळे जेवणाला एक वेगळीच चव येते. तसेच लसूण रोज सेवन केल्याने त्याचे अनेक फायदे आहेत. लसणाचे लोणचे अगदी १० मिनिटात तयार होते. तुम्ही कधीपण तयार करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने. तसेच लसणाचा आपण डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी देखील त्याचा वापर करू शकतो.

हे ही वाचा : चॉकलेट केक बनवण्याची रेसिपी

 

साहित्य –

तेल – अर्धी वाटी

मेथ्या -१ चमचा

मोहरी – १ चमचा

बडिशोप – १ चमचा

कलौंजी – १ चमचा

कडीपत्ता – ८ ते १० पाने

लाल मिरच्या – ५ ते ६

लसूण पाकळ्या – २० ते २५

हळद – १ चमचा

लाल तिखट – अर्धा चमचा

व्हिनेगर – पाव वाटी

मीठ – चवीपुरते

 

कृती –

सर्व प्रथम पॅन मध्ये तेल चांगले गरम करून घेणे.

त्यानंतर मेथीचे दाणे टाकून ते थोडे लालसर होऊन द्यावे.

त्यामध्ये मोहरी आणि कलौंजी घालून फोडणी तडतडून द्यावी.

यामध्ये लाल मिरच्या आणि कडीपत्ता घालावा.

मग यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून हे सर्वे मिश्रण एकजीव करून घेणे.

त्यामध्ये नंतर हळद, तिखट आणि मीठ घालणे.

नंतर व्हिनेगर घालून साधारण २ मिनीटे चांगले शिजवून घेणे.

गार झाल्यावर लसणाचे लोणचे एका भांड्यात काढून घ्यावे.

हे ही वाचा :

सीताफळापासून बनवा रबडी घरच्या घरी

 

Latest Posts

Don't Miss