उरलेल्या भातापासून बनवा हॉटेल सारखा फ्राईड राईस

उरलेल्या भातापासून बनवा हॉटेल सारखा फ्राईड राईस

बऱ्याच वेळा भात उरतो. आणि उरलेल्या भाताचे काय कराचे असा प्रश्न पडतो . उरलेल्या भातापासून आपण वेगवेगळी पदार्थ देखील बनवू शकतो . तसेच गाजर , बीट , कोबी , यासारख्या भाज्या आपल्या आरोग्याला भरपूरप्रमाणत पोषक तत्वे देतात . ह्या भाज्या जर आपण उरलेल्या भातामध्ये वापरून आपण घरच्या घरी फ्राईड राईस बनवू शकतो . आपल्याला हॉटेल मध्ये देखील जाण्याची गरज नाही . आपण आता घरच्या घरी हॉटेल सारखे जेवण घरी बनवू शकतो . त्याला हॉटेल सारखी टेस्ट देखील देऊ शकतो . १० मिनिटात तयार होईल फ्राईड राईस आणि तुम्ही हा पदार्थ रात्रीच्या जेवणाला देखील स्वादिष्ट म्हणून खाऊ शकता . तसेच फ्राईड राईस सर्वांना आवडतो . तर आज आम्ही दाखवणार आहोत फ्राईड राईस कसा बनवायचा .

हे ही वाचा : हिवाळ्यात रताळी खाणे ठरते शरीरासाठी फायदेशीर

 

फ्राईड राईस बनवण्याची रेसिपी –

फ्राईड राईस बनवण्याचे साहित्य –

१ वाटी (उकडलेले) तांदूळ

तेल

लसूण ३-४

लाल मिरची चवीनुसार

गाजर

३-४ बेबीकॉर्न,

कोबी

तीळ (१/२)

काळीमिरी

सोया सॉस

कोथिंबीर

 

फ्राईड राईस बनवण्याची कृती –

सर्व प्रथम एका कढईत तेल घेणे. तेल चांगले गरम होऊन देणे .

त्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून चांगले तळून घेणे .

त्यामध्ये बेबीकॉर्न, गाजर , कोबी , तीळ , हे पदार्थ शिजल्यानंतर त्यामध्ये भात घालून घ्या .

भात चांगला परतून घ्या आणि त्यामध्ये मीठ, मिरपूड घालून सोया सॉस आणि १ मिनिट शिजवा.

कोथिंबीर वरून घालून सजावट करून घ्या .

हे ही वाचा :

नवरात्रीमध्ये बनवा स्पेशल पनीर बुर्जी , कांदा आणि लसूण न वापरता

 

Exit mobile version