spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोलकता स्पेशल रसगुल्ला घरच्या घरी बनवा

कोलकता मिठाईसाठी खूप प्रसिद्ध शहर आहे. कोलकत्यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई मिळतात. आणि त्या खाण्यासाठी खूप स्वादिष्ट असतात. तसेच रसगुल्ला हा गोड पदार्थ कोलकत्यामध्ये खूप प्रसिद्द आहे. आणि रसगुल्ल्याचे नाव घेतल्यास तोंडाला पाणी सुटे. चमचमीत आणि गोडपणाने भरलेली, ही रसाळ मिठाई बंगाली लोकांना नाहीतर तर पूर्ण भारतीय लोकांना आवडते. जर तुम्ही कधी कोलकत्याला गेला तर मिठाईच्या दुकानात नक्की जावा. तसेच रसगुल्ला हा पदार्थ बनवणे खूप सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया कोलकता स्पेशल रसगुल्ला घरच्या घरी कसा बनवायचा.

हे ही वाचा : घरच्या घरी फ्रेंच टोस्ट बनविण्याची रेसिपी

 

रसगुल्ला बनवण्याची रेसिपी –

रसगुल्ला बनवण्याचे साहित्य –

१/२ लीटर थंड दूध

१ कप साखर

२ कप पाणी

आवश्यकतेनुसार लिंबूचा रस

१ छोटा चमचा मक्याचे पीठ

 

रसगुल्ला बनवण्याची कृती –

सर्व प्रथम बाउल घ्या त्यामध्ये दूध टाका. आणि ते गरम करण्यासाठी ठेवा. आणि दूध चांगले उखळून घ्या. दूध उकळ्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस पिळा. लिंबू पिळल्यानंतर ते दूध फाटेल.

दूध फाटल्यानंतर त्याला थोडे शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून, त्याचे पनीर बनवून घ्या. आता यामध्ये थोडे पाणी घाला. यामुळे पनीरच्या सिरका असलेला तो आंबटपणा पूर्णपणे निघून जाईल.

आता हे पनीर एका कपड्यामध्ये ठेवा. दहा पंधरा मिनिटे ते बांधून ठेवा. यामध्ये असलेलं पाणी निघून जाईल.

एका कढईत २ कप पाणी घ्या. त्यामध्ये साखर घालून ढवळत राहा. या पाण्याला चार ते पाच मिनिटे उकळवा आणि चांगला पाक बनून घ्या.

पनीर कपड्यातून वेगळे करा. त्यात थोडसं कॉर्नफ्लॉवर घाला. ते मिश्रण एकत्र जरून घ्या आणि कणिक मळून घ्या. कणिक मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करा.

साखरेच्या पाक मध्ये तयार केले गोळे चांगले शिजवून घ्या. आणि खाण्यासाठी रसगुल्ला तयार आहे.

हे ही वाचा :

कोजागिरी पोर्णिमेसाठी स्पेशल मसाला दूध कसे बनवायचे, जाणून घ्या रेसिपी

 

Latest Posts

Don't Miss