Makhana Bhel भेळ बनवा घरच्या घरी, सोप्पी रेसिपी फक्त तुमच्यासाठी!

जे लोक स्ट्रिक्ट डाईट पाळतात त्यांना चमचमीत भेळचा आस्वाद घेता येत नाही.

Makhana Bhel भेळ बनवा घरच्या घरी, सोप्पी रेसिपी फक्त तुमच्यासाठी!

भेळ म्हंटल की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटत. लहान असो की मोठा प्रत्येकजण भेळ हा खाद्यपदार्थ आवडीने खातो. शेव, कुरमुरे, फरसाण, कांदा, टोमॅटो, गोड – तिखट चटण्या यांच्यापासून तयार झालेली चटपटीत भेळ खायला सगळ्यांनाच आवडते. व भेळ खाण्यासाठी प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटते. परंतु ही चमचमीत भेळ खाल्याने आपले वजन वाढते. म्हणूनच जे लोक स्ट्रिक्ट डाईट पाळतात त्यांना चमचमीत भेळचा आस्वाद घेता येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्या साठी स्पेशल डाईट ला चालणारी मखाना भेळ रेसिपी घेऊन आलो आहोत.

मखाणा भेळ आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो. रोजच्या भेळीपेक्षा मखाणा भेळ खाणे हा हेल्थ आणि डाएटच्या बाबतीत हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आपल्या रोजच्याच भेळेलाच मखाण्याची जोड देऊन प्रोटीन रिच मखाणा भेळ घरच्या घरी बनवू शकतो. यामुळे आपले हेल्दी डाएट देखील पाळले जाईल आणि काहीतरी चटपटीत, मसालेदार खाण्याचा आनंद देखील मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात ही मखाणा भेळ कशी तयार करावी.

मखाना भेळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –

भाजलेले मखाणे – १ कप
भाजलेले शेंगदाणे – १ कप
भाजलेले चणे – १ कप
कांदा – १/३ कप
टोमॅटो – १/३ कप
काकडी – १/३ कप
मीठ – चवीनुसार
चाट मसाला – चवीनुसार
लाल तिखट मिरची पावडर – १/२ टेबलस्पून
हिरवी चटणी – १ टेबलस्पून
लिंबाचा रस – १ टेबलस्पून
कोथिंबीर – १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

मखाना भेळ तयार करण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये, भाजून घेतलेले मखाणे घ्यावेत. त्यानंतर त्यात भाजून घेतलेले चणे, शेंगदाणे घालावेत. आता यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी घालावी. त्यानंतर या मखाण्यांमध्ये, चवीनुसार मीठ, चाट मसाला, लाल तिखट मिरची पावडर भुरभुरवून घालावी. सगळ्यांत शेवटी यात हिरवी चटणी, लिंबाचा रस, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी. आता ही मखाण्यांची भेळ चमच्याच्या मदतीने एकजीव करून घ्यावी.

अशा प्रकारे चटपटीत आणि हेल्दी अशी मखाना भेळ तयार आहे.

हे ही वाचा:

प्रभुदेवा बनला वयाच्या ५०व्या वर्षी बाबा

या पठ्याचा जुगाड पाहून आनंद महिंद्रा यांची ही प्रतिक्रिया…

‘मंगाजी’ की कहानी पुरी फिल्मी है

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version