घरच्या घरी बनवा मसाला खिचडी

घरच्या घरी बनवा मसाला खिचडी

सध्या परतीचा पाऊस चालू आहे. आणि आपल्याला चमचमीत पदार्थ खाऊशी वाटतात. तुम्ही खिचडी नेहमी घरी बनवत असतात पण तुम्हाला माहित आहे का मसाला खिचडी कशी बनवायची ? तसेच खिचडी हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. हा असा पदार्थ आहे की जो कधीपण कोठेपण बनवता येतो. तसेच खिचडी हा पदार्थ झटपट तयार होणारा पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया मसाला खिचडी कशी बनवायची.

हे ही वाचा: Crab : खेकडा खाण्याचे फायदे

 

कृती –

१ वाटी तांदूळ

१/२ वाटी तूरडाळ

बटाटा

टोमॅटो

कडीपत्ता

कांदा

जिरे

मोहरी

गरम मसाला

तिखट

हळद

हिंग

मीठ चवीनुसार

शेंगदाणे

कोतंभीर

तूप

कृती –

सर्व प्रथम तांदूळ आणि तूरडाळ स्वच्छ धुहून घेणे.

त्यानंतर कुकर मध्ये जिरे ,मोहरी , हिंग , कडीपत्ता घालून चांगले परतवून घेणे.

त्यानंतर मिश्रण चांगले परतवून झाल्यानंतर त्यामध्ये बटाटा , कांदा ,टोमॅटो , घालणे आणि चांगले परतून घेणे. मग त्यामध्ये तिखट हळद गरम मसाला गोड मसाला घालून घेणे आणि परत एकदा परतवून घेणे. आणि परतवून झाल्यानंतर त्यामध्ये तांदूळ आणि डाळ घालून कुकरचे झाकण लावून घेणे. ४ – ५ शिट्या देणे आणि गरमा गरम मसाला खिचडी तयार आहे.

हे ही वाचा: 

तुम्ही चाहप्रेमी आहात का? तर चहासोबत या पदार्थाचे सेवन करू नका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version