सणाचा गोडावा वाढवण्यासाठी बनवा घरच्या घरी मावा कचोरी

सणाचा गोडावा वाढवण्यासाठी बनवा घरच्या घरी मावा कचोरी

सणाच्या निमित्ताने तुम्ही घरीच गोड मावा कचोरी बनवू शकता. मावा आणि सुक्या मेव्यापासून ते तयार केले जाते. सण म्हटल्यावर गोडाचे पदार्थ तर आले. तसेच सर्वांना गोड खायला खूप आवडते. सणासुदीमध्ये गोड पदार्थ काय बनवायचे हा प्रश्न तुम्हाला नक्की पडतो. सणासुदीमध्ये काही वेगळे गोड पदार्थ केल्यास मुलांना देखील आनंद होतो. घरच्या घरी गोड पदार्थ केल्यास एक वेगळीच चव येते. खाता नाही देखील आनंद होतो. तर आज आपण मावा कचोरी कशी बनवायची ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत.

हे ही वाचा : आज तुमच्यासाठी स्पेशल मखान्याचा हलवा

मावा कचोरी बनवण्याची रेसिपी –

मावा कचोरी बनवण्याचे साहित्य –

२०० ग्रॅम मैद्याचे पीठ

कचोऱ्या तळण्यासाठी ४०० ग्रॅम तूप

पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी

साखरेच्या पाकासाठी २ कप पाणी,४ कप साखर

१ कप पिठीसाखर

केसर

२०० ग्रॅम गोड मावा

काजू, बदाम, पिस्ता १ वाटी चिरलेले

वेलची पूड

 

मावा कचोरी बनवण्याची कृती –

सर्वप्रथम बाऊल घ्या त्या बाऊलमध्ये मैदा एक चमचा तूप पाणी घालून पीठ मळून घ्या. तयार केलेले पीठ तीस मिनिटं बाजूला ठेवणे. त्यानंतर एका कढईमध्ये मावा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या. मावा परतून झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या आणि तो थंड करण्यासाठी ठेवा. साखरेच्या पाकासाठी एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घालून शिजवून घ्या. साखरेचा पाक तयार झाल्यानंतर त्यात वेलची पूड आणि केसर घालून घ्या. आता थंड माव्यात पिठीसाखर आणि काजू बदाम पिस्ता बारीक चिरलेले घालून घ्या. त्यानंतर या माव्याचे गोळे करून घ्या. तयार केलेल्या पिठाचे गोळे तयार करून घ्या. तयार केलेले गोळे पुऱ्याच्या आकारामध्ये लाटून घ्या आणि त्यात तयार केलेले माव्याचे मिश्रण भरून घ्या .आणि त्याला एक कचोरीचा आकार द्या आणि तुपामध्ये तळून घ्या . तुमच्यासाठी गरमागरम मावा कचोरी खाण्यासाठी तयार आहे.

हे ही वाचा :

साऊथ इंडियन फूडचे चाहते असाल तर घरच्या घरी बनवा हा पदार्थ

 

Exit mobile version