spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गाजर पासून बनवा पौष्ठिक ‘गाजर वडी’

तुम्हाला खोबऱ्याची वडी माहितच असेल ? पण तुम्हाला गाजराची वडी माहित आहे का ? तर आज आम्ही तुम्हाला गाजराची वडी कशा पद्धतीने बनवता येईल या बद्दल सांगणार आहोत. गाजर पासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात. जसे गाजर हलवा, गाजर वडी असे पदार्थ बनवतात येतात. गाजर आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी रोज एक तरी गाजर खाल्ले पाहिजे . गाजर (carrot) एक कंदमूळ आहे. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वे असतात. तसेच गाजरात व्हिटॅमिन्स,(Vitamins) मिनरल्स (Minerals) अँटी ऑक्सिडंट (Anti-oxidant) आणि बिटा केरोटीन (Beta protein) असतात. रोज नियमितपणे गाजर खाल्ले पाहिजे त्यामुळे शरीरास योग्य प्रमाणात पोषक तत्वे मिळतात. तसेच गाजराचे अनेक फायदेही आहे. गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन देखील असते, तसेच गाजर मध्ये व्हिटॅमिन ए (Vitamin A) असते. आणि ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

साहित्य :

तूप

गाजर गरजेनुसार

खवा किंवा मिल्क पावडर १ कप

साखर १ कप

खोबऱ्याचा किस गरजेनुसार

बदाम, काजू, पिस्ता

वेलची पूड (अर्धा चमचा)

 

कृती –

सर्व प्रथम गाजर स्वच्छ धुवून घेणे आणि बारीक किसून घेणे.

नंतर कढईत तूप घालून घेणे आणि तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये किसलेले गाजर घालून घेणे आणि १० मिनिटे तरी परतून घेणे.

गाजर चांगले परतून झाले की त्यामध्ये साखर खवा मिल्क पावडर घालून घेणे. आणि त्यामध्ये बदाम काजूचे तुकडे घालून घेणे हे मिश्रण घट्ट होण्यासाठी साधारण १० मिनिटे तरी परतून घेणे.

मिश्रण चांगले घट्ट झाले की त्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घेणे. आणि परत एकदा परतवून घेणे पण मिश्रण घट्ट होईस पर्यंत परतून घेणे. आणि त्यामध्ये वरून वेळी पूड घालून घेणे. मिश्रण पूर्ण तयार झाल्यानंतर ताटात काढून घेणे आणि त्याच्या वड्या तयार करून घेणे.

हे ही वाचा:

चमचमीत आणि पौष्टीक मेथीचा पराठा

दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Latest Posts

Don't Miss