कडाक्याच्या थंडीत करा पौष्टिक नाचणीचे लाडू…

कडाक्याच्या थंडीत करा पौष्टिक नाचणीचे लाडू…

हिवाळा हा ऋतू सुरु झाला आहे. थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीचे (winter season) दिवस म्हटले की आपल्याला गरमागरम आणि चमचमीत पदार्थ (food) आणि गोड पदार्थ खाऊ वाटतात. तसेच हिवाळयात नाचणीचे सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त राहते. हिवाळयात नाचणीचे सेवन आवर्जून केलं पाहिजे. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून नाचणी पासून लाडू कसे बनवायचे या बद्दल सांगणार आहोत.

तसेच नाचणीमध्ये प्रथिने, कॅल्शिअम, फॉस्फरस यांचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आपली हाडे मजबूत राहण्यासाठी मदत होते. तसेच नाचणी लहान मुलांसाठी देखील खूप चांगली आहे. मुलांच्या वाढत्या वयासाठी आणि जेष्ठांसाठी हाडे मजबूत करण्यासाठी नाचणी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी नाचणीचे सेवन केल्याने साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि कोलेस्टेरॉल देखील नियंत्रणात राहते. शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि रक्तभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी तुम्ही नाचणीचे सेवन करू शकता.

 

साहित्य :

नाचणीचे पीठ – ३ वाट्या
तूप – १ वाटी
पिठीसाखर – २ वाट्या
दूध – अर्धी वाटी

कृती :

सर्व प्रथम कढईमध्ये तूप घालून घ्या. त्यानंतर त्यामध्ये नाचणीचे पीठ घालून घ्या आणि चांगले भाजून घ्या. नाचणीचे पीठ भाजताना सारखे हलवत राहा नाहीतर ते लगेच करपून जाते. सोनेरी रंग येईसपर्यंत भाजत राहा.

नाचणीचे पीठ चांगले भाजून झाल्यानंतर त्यामध्ये दूध घालून घ्या. मिश्रण एकजीव करून घ्या. गॅस बंद करुन घ्या. नंतर तयार केलेल्या मिश्रणामध्ये पिठीसाखर घालून घेणे आणि मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. जर तुम्हाला नाचणीचे मिश्रण कोरडे वाटले की त्यामध्ये दूध आणि तूप थोडे घालून घ्या. म्हणजे लाडू वळताना काही त्रास होणार नाही. तुम्हाला हवे असल्यास नाचणीच्या मिश्रणामध्ये काजू बदाम देखील घालून घेऊ शकता. त्यामुळे लाडू अजून पौष्टिक होतात आणि चवीला देखील खूप स्वादिष्ट लागतात. मिश्रण तयार झाल्यानंतर लाडू वळून घ्या.

हे ही वाचा : थंडीच्या दिवसात मुलांना द्या ‘हे’ पदार्थ….

 

Exit mobile version