सीताफळापासून बनवा रबडी घरच्या घरी

सीताफळापासून बनवा रबडी घरच्या घरी

सीताफळ खायाला सर्वांनाच आवडते. सीताफळ हे हिवाळ्यामध्ये जास्त उपलब्द असते. सीताफळ मध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. सीताफळ खाल्याने मधुमेहाचा त्रास कमी होतो. आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. नियमितपणे सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. सीताफळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सीताफळ पासून आपण सीताफळ खीर , असा पदार्थ देखील बनवू शकतो. सीताफळाचे सेवन केल्यास हृदय निरोगी राहते. सीताफळा मुळे शरीरातील अशक्तपणा कमी होतो. डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहेत. तर आज आम्ही तुम्हाला सीताफळ पासून रबडी कशी बनवायची ते आज सांगणार आहोत.

हे ही वाचा : सणाचा गोडावा वाढवण्यासाठी बनवा घरच्या घरी मावा कचोरी

 

सीताफळ पासून रबडी बनवायची रेसिपी –

सीताफळ पासून रबडी बनवायचे साहित्य –

एक लिटर दूध

चार वाट्या साखर

दोन वाट्या सीताफळाचा गर

चिमूटभर केशर

काजु,बदाम, पिस्ता

 

सीताफळ पासून रबडी बनवण्याची कृती –

सर्व प्रथम एका भांड्यात दूध घ्यावे. आणि दूध आटवायला ठेवावे १ लिटरच्या दुधाला अर्धा लिटर दूध करून घ्यावे. आणि त्यात साखर घालावी. दुधात साखर चांगली मिसळी की त्यात केसर घालावे. त्यानंतर तयार केलेले मिश्रण थंड करायला ठेवावे. दूध थंड झाल्यावर त्यामध्ये सीताफळाचे गर घालावे आणि चांगले ढवळून घेणे. ढवळून झाल्यानंतर त्या मिश्रणाला फ्रिज मध्ये ठेवणे. आणि मग ते सर्व्ह करून घ्यावे.

हे ही वाचा :

चमचमीत चिकन रोल’ रेसिपी घ्या जाणुन

 

Exit mobile version