पुदिना मसाल्याचा वापर करून रायता बनवा आणखी टेस्टी…

पुदिना मसाला हा चटणी, रायता, कोशिंबीर, चाट किंवा पेयांमध्ये वापरला जातो. हा पुदिना मसाला चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हा मसाला घातल्याने पदार्थाला एक वेगळीच चव येते. पुदिना मसाला कसा बनवायचा याची रेसिपी पाहूयात. 

पुदिना मसाल्याचा वापर करून रायता बनवा आणखी टेस्टी…

प्रत्येकाला जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवेच असते. ताटात तोंडी लावण्यासाठी बहुतेक गृहिणी लोणचं, पापड, कोशिंबीर, भजी, रायता असे अनेक विविध प्रकार करताना दिसतात. त्यात सर्वांच्या आवडीचा प्रकार म्हणजे रायता. प्रत्येकजण आपापल्या चवीनुसार रायता बनवत असतो. रायत्यामध्ये अनेक प्रकारही पाहायला मिळतात. बुंदी रायता, कांदा रायता असे अनेक प्रकार आहेत. पण रायता कोणताही असो त्यात फळे, भाज्या किंवा बुंदीमध्ये दही मिसळून बनवले जाते. ते अधिक चवदार बनवण्यासाठी त्यात चाट मसाला आणि जिरे टाकले जातात. पण आज आगळीवेगळी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमच्या रायत्याची चव आणखी चविष्ट होईल. पुदिना मसाला हा चटणी, रायता, कोशिंबीर, चाट किंवा पेयांमध्ये वापरला जातो. हा पुदिना मसाला चवीसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हा मसाला घातल्याने पदार्थाला एक वेगळीच चव येते. पुदिना मसाला कसा बनवायचा याची रेसिपी पाहूयात. 

पुदिना मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

पुदिना मसाला बनवण्याची कृती:

पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यातील सर्व पाणी निथळून घ्या. यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात पुदिना, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची बारीक पेस्ट करून घ्या. त्यात थोडेसे पाणी घालून घ्या म्हणजे मिश्रण व्यवस्थित बारीक होईल. तयार केलेल्या पेस्टमध्ये जिरे पावडर, काळे मीठ, काळी मिरी पावडर, चाट मसाला आणि आमचूर पावडर घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. आवश्यक असल्यास आपल्या चवीनुसार त्यात मसाले कमी जास्त टाकू शकता. जर तुम्हाला थोडे आंबट करायचे असेल तर तर तुम्ही लिंबाचा रस घालू शकता. तयार केलेला मसाला एका हवाबंद झाकणाच्या बरणीमध्ये ठेवू शकता. हा मसाला बरेच दिवस फ्रिजमध्ये राहू शकतो.

 
 

World Population Day 2024: जागतिक लोकसंख्या दिवस का साजरा करतात? जाणून घ्या महत्त्व

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version