चमचमीत पिझ्झा बनवा अगदी घरगुती स्टाईलमध्ये

चमचमीत पिझ्झा बनवा अगदी घरगुती स्टाईलमध्ये

पिझ्झा हा अगदी लहानमुलांपासून ते अगदी मोठ्यापर्येंत आवडतो. पिझ्झाचे नाव जरी काढले तरी जिभेला पाणी सुटे. अगदी कधीही पिझ्झा मिळाला, तरी सगळे खुश होतो आपण. पिझ्झाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. जसे की चीज पिझ्झा , टोमॅटो पिझ्झा , ओनियॉन पिझ्झा , फ्रुट पिझ्झा , पनीर पिझ्झा , असे पिझ्झाचे प्रकार आहे. पिझ्झा आपण कधीही घरी बनवून खाऊ शकतो असा प्रकार आहे. तर आज आपण जाणून घेऊया घरचा स्टाईल मध्ये पिझ्झा कसा बनवायचा.

हे ही वाचा : दुधासोबत मधाचे सेवन केल्यास आरोग्यासाठी गुणकारक ठरेल

 

रेसिपी –

 

साहित्य –

२ कप मैदा

अर्धा कप दही

खायचा सोडा

बेकिंग पावडर

मीठ चवीपुरता

ऑलीव्ह ऑइल

टोमॅटो पियूरी

लसूण

चिली फ्लॅक्स

पिझ्झा सिजलिंग

पिठी साखर

चीज

लाल शिमला मिरची

पिवळी शिमला मिरची

मका

ओनियॉन

कृती –

सर्वप्रथम बाउल मध्ये २ कप मैदा आणि अर्धी वाटी दही टाकायचा सोडा बेकिंग पावडर मीठ आणि ऑलिव्ह ऑइल हे सर्व मिश्रण मिक्सकरून त्याचे कणिक मळवून घेणे. त्यानंतर दुसऱ्या बाउल मध्ये टोमॅटो पियूरी, लसूण , चिली फ्लॅक्स , पिझ्झा सिजलिंग आणि पिठी साखर मीठ घालून मिक्सकरून टोमॅटो सॉस बनवून घेणे. त्यानंतर चपाती बनवून घेणे ती चपाती एका गोल प्लेट मध्ये पसरून घ्याची आणि चांगली घट्ट साईड ने लावून घायचे. मग ती चपाती एका जाळीवर ठेवून घायची . त्यानंतर त्या गोल चपातीवर तयार केलेला टोमॅटो सॉस घालून घायचा आणि त्यावर चीज ,लाल शिमला मिरची , पिवळी शिमला मिरची , मका ,ओनियॉन घालून घायची त्यानंतर सर्व तयार झाल्यानंतर तवेवर १५ ते २० मिनिटे ठेवून शिजवून घेणे. आणि गरमागरम पिझ्झा तयार आहे.

हे ही वाचा :

दहीवडे बनवण्याची साधी आणि सोपी रेसिपी

 

Exit mobile version